कर्जाच्या अमिषाने फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 12:17 PM2020-01-22T12:17:41+5:302020-01-22T12:17:47+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : प्रकाशा ता़ शहादा येथील एकाची कर्ज देण्याच्या बहाण्याने तब्बल सहा लाख रुपयात फसवणूक झाल्याची ...

Loan amnesia fraud | कर्जाच्या अमिषाने फसवणूक

कर्जाच्या अमिषाने फसवणूक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : प्रकाशा ता़ शहादा येथील एकाची कर्ज देण्याच्या बहाण्याने तब्बल सहा लाख रुपयात फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे़ नोव्हेंबर ते डिसेंबर २०१९ दरम्यान हा प्रकार घडला होता़
प्रकाशा येथील भरत रामदास चौधरी यांच्या मोबाईल क्रमांकावर नोव्हेंबर २०१९ मध्ये अज्ञात व्यक्तीने संपर्क करत एका नामांकित फायनान्स कंपनीमधून १५ लाखांचे कर्ज अत्यंत कमी व्याजदरात मिळवून देण्याचे अमिष दिले होते़ यातून भरत चौधरी यांच्याकडून संबधित ‘भामट्या’ने वेळावेळी प्रोसेसिंगच्या नावाखाली पैश्यांची मागणी केली होती़ कमी व्याजदराने अधिक कर्जाच्या अमिषाला बळी पडून भरत चौधरी यांनी नोव्हेंबर ते डिसेंबर या एका महिन्याच्या काळात ५ लाख ८४ हजार ८०३ रुपये आॅनलाईन जमा केले होते़ यानंतर महिला उलटूनही संबधिताने कर्ज देण्याबाबत कोणतीही कारवाई न केल्याने अखेर त्यांना फसवणूक झाल्याचे जाणवले होते़
याबाबत भरत चौधरी यांनी सोमवारी सायंकाळी शहादा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन पैसे लाटणाऱ्या अज्ञात भामट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील करत आहेत़
दरम्यान याप्रकाराने खळबळ उडाली आहे़ शहादा पोलीसांकडून सायबर सेलची मदत घेऊन संबधित फसवणूक करणाºयाचा शोध घेतला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़ ग्रामीण भागात आर्थिक फसवणूक करणारे संपर्क करत असल्याने भिती निर्माण झाली आहे़ शहादा तालुक्याच्या विविध भागात याप्रकारे फसवणूक करणाऱ्यांचे कॉल्स येत असल्याची माहिती आहे़

Web Title: Loan amnesia fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.