जिल्ह्यात पाच दिवस पुन्हा ‘लॉकडाऊन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 12:10 PM2020-04-21T12:10:34+5:302020-04-21T12:10:42+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शासनाने अधिसूचना काढून काही क्षेत्रांवरील बंधने शिथिल करुन नागरिकांना दिलासा दिला आहे़ राज्यातील विविध ...

 Lockdown again in district five days | जिल्ह्यात पाच दिवस पुन्हा ‘लॉकडाऊन’

जिल्ह्यात पाच दिवस पुन्हा ‘लॉकडाऊन’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शासनाने अधिसूचना काढून काही क्षेत्रांवरील बंधने शिथिल करुन नागरिकांना दिलासा दिला आहे़ राज्यातील विविध भागात त्याचे पालन सोमवारी सुरु झाले़ नंदुरबार जिल्ह्यातही दुपारपर्यंत सर्व आलबेल स्थिती असताना सायंकाळी तिघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाने शिथिलता देण्याच्या निर्णयावर फेरविचार करुन रात्री उशिरा पाच दिवसांचा लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे़
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी जिल्ह्यातील सर्व दुकाने व पेट्रोल पंप २५ एप्रिलपर्यंत बंद राहतील. केवळ किराणा, दूध आणि भाजीपाला विक्री सकाळी ८ ते दुपारी १२ या वेळेत सुरू राहील. रुग्णालये, औषधांची दुकाने, बँक आणि कृषी उत्पन्न बाजार समीतीतील व्यवहार सुरू राहतील, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत. नागरिकांना जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी वाहनाचा वापर करता येणार नाही. किराणा किंवा भाजीपाला आपल्या भागातील दुकानातूनच खरेदी करावा. अनावश्यक बाहेर फिरणे टाळावे, असे आढळल्यास कडक कारवाई करण्यात येणार असून जीवनावश्यक सेवेशिवाय इतर कोणत्याही आस्थापना सुरू राहणार नाहीत. शासकीय कार्यालये १० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरु राहतील असे जिल्हाधिकारी डॉ़ भारुड यांनी कळवले आहे़
लॉकडाऊनसंदर्भात शासनाने सोमवारपासून अधिसूचना काढून अतिरिक्त औद्योगिक घटकांसह शेतीविषयक बाबी, बांधकाम क्षेत्र यासह शासकीय कार्यालयात १० टक्के कर्मचारी उपस्थितीला हिरवा कंदील दिला आहे़ यानुसार शासकीय कार्यालयांचे कामकाज सोमवारी सुरळीतपणे सुरु झाले होते़ जिल्ह्यात १८ पासून तीन दिवसांचा मेगा लॉकडाऊन असल्याने मंगळवारपासून या सवलती देण्याचे निर्धारित होते़ परंतू सोमवारी सायंकाळी शहरातील प्रभाग १० मधील कोरोनाबाधित रुग्णाच्या कुटूंबातील तिघांचे स्वॅब नमुने पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली़ रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर त्यांना तातडीने आयोसोलेश वॉर्डात दाखल करण्यात येऊन त्यांच्या संपर्कात आलेल्या रुग्णांचा धांडोळा घेण्यास जिल्हा प्रशासन, पोलीस दल आणि आरोग्य विभाग यांनी सुरुवात केली आहे़ दरम्यान पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाची ट्रॅव्हल हिस्ट्री अद्यापही पूर्णपणे समोर आलेली नसल्याची माहिती आहे़ त्यामुळे लागण नेमकी झाली कुठे असा प्रश्न उपस्थित होत आहे़ दरम्यान सोमवारी जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भारुड यांनी जिल्हा आणि तालुकास्तरावरील अधिकाऱ्यांसोबत संवाद साधत मंगळवारपासून शिथिलता मागे घेण्यावर चर्चा करुन पाच दिवस पुन्हा लॉकडाऊन कठोर करण्याचा निर्णय घेतला़


या सवलतींवर २५ नंतर निर्णय

रुग्णालये, प्रयोगशाळा, औषधांची दुकाने, वैद्यकीय साहित्य विक्री केंद्र ही यापुढे सुरु राहतील़
कृषी विषयक कामे, बागायती कामासाठी लागणारे साहित्य खरेदी विक्री केंद्रे, कृषी माल खरेदी केंद्र, मार्केट यार्ड, मासेमारी, मस्त्य विक्री़
दुग्धजन्य पदार्थ प्रक्रिया केंद्र, दुग्ध संकलन, प्रक्रिया, वितरण आणि विक्री़
पोल्ट्री फार्म, हॅचरीज़
पशुखाद्य निर्मिती प्रकल्प, मका सोया कच्च्या मालाचा पुरवठा़
गोशाळा, प्राण्यांचे शेल्टर होम़
वने, वनेत्तर क्षेत्र, तेंदूपत्ता संकलन, प्रक्रिया वाहतूक आणि विक्री़
रिझर्व्ह बँकेकडून नियंत्रित करण्यात येणाऱ्या वित्तीय संस्था कमीत कमी कर्मचाऱ्यांसह सुरु कराव्यात़
बँक शाखा, एटीएम, व्यवहारासाठी आवश्यक आयटी पुरवठादार, बँकीग करस्पाँडट, एटीएम आॅपरेशऩ
इन्शुरन्स सेवा़
बालके, दिव्यांग, मतीमंद, ज्येष्ठ नागरिक, निराधार महिला, विधव यांची निवासीगृहे़
अल्पवयीन मुलांची निरीक्षण गृहे़
ज्येष्ठ नागरिक विधवा, स्वातंत्र्य सैनिक यांच्या निवृत्त योजनांमधील निधीचे वाटप, निवृत्तीवेतन आणि प्रॉव्हिडंट विषयक सेवा़
पोषण आहाराचा घरपोच पुरवठा़
सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर करुन मनरेगाची कामे सुरु करण्यात यावीत़
पेट्रोल, डिझेल, केरोसिन, सीएनजी, एलपीजी, पीएनजी या इंधनाचे वितरण, वाहतूक, साठा करणे आणि विक्री सुरु ठेवणे़
पोस्ट सेवा़
पालिका, नगरपालिका, ग्रामपंचायतींतर्गत पाणी पुरवठा, स्वच्छता, कचरा व्यवस्थापनाचे कामकाज़
दूरध्वनी आणि इंटरनेट सेवा पुरवठा़
राज्यांतर्गत आणि आंतरराज्यीय वस्तू आणि मालाची ने-आण करण्यास परवानगी़
जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याला परवानगी़
ग्रामपंचायत स्तरावरील सीएससी सेंटर्स, कुरीयर सेवा, पर्यटक आणि नागरिकांची व्यवस्था करणाºया लॉज आणि हॉटेल्स़ रेस्टॉरंटमधून पार्सल सेवा, फरसाण व मिठाईची दुकाने़
पालिका क्षेत्राच्या बाहेरील उद्योग़ कृषी, फलोत्पादन व कृषी प्रक्रिया, पॅकेजिंग आणि वाहतूक उद्योग़

Web Title:  Lockdown again in district five days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.