लॉकडाऊनने शेतकरी देशोधडीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 12:17 PM2020-05-11T12:17:38+5:302020-05-11T12:20:34+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय व त्यास अटकाव ...

Lockdown displaced farmers | लॉकडाऊनने शेतकरी देशोधडीला

लॉकडाऊनने शेतकरी देशोधडीला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय व त्यास अटकाव करण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आल्याने गेल्या महिन्याभरापासून संपूर्ण बाजारपेठ बंद आहेत. त्याच्या परिणाम शेतकऱ्यांनी पीकविलेल्या फळ पिकावर होत आहे.
तालुक्यातील शेतकºयांकडून केळी, पपई, टरबूज, डांगर या फळ पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. यावर्षीदेखील शेतकºयांकडून या पिकांचे उत्पादन घेण्यात आले आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व बाजारपेठा बंद असल्याने व्यापाºयांकडून या फळ पिकांना मागणी नसल्याने त्यांचे अतोनात नुकसान होऊन शेतकºयांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. लागवड ते काढणीपर्यंत लागलेला खर्चदेखील निघणार नसल्याचे शेतकºयांकडून सांगण्यात येत आहे.
सुलतानपूर येथील शेतकºयाने दोन एकर क्षेत्रामध्ये डांगर पिकाची लागवड केली आहे. लॉकडाऊनच्या आधी दोन एकर क्षेत्रामधून निघणाºया डांगराचे २० रूपये किलो प्रमाणे खरेदी करण्याची बोलणी केली होती. मात्र लॉकडाऊन सुरू झाल्याने बाजारपेठ बंद असल्याने व्यापारीने माल खरेदी करण्यास नकार दिला. त्यानंतर आर्थिक नुकसान सोसत शेतकºयाने पाच ते दहा रूपये किलोने उत्तम दर्जाच्या मालाची विक्री केली असून, अद्यापही माल शेतात पडून आहे.
हे फळ पिके नाशवंत असल्याने शेतकºयांना ते जास्त दिवस साठवून ठेवणे शक्य नाही. रमजान महिन्यामध्ये टरबूज या पिकाला मोठी मागणी असते. मात्र लॉकडाऊन असल्यामुळे व्यापारीही खरेदीसाठी येत नसल्याने काढणी केलेला माल साठवून ठेवल्यामुळे खराब होत आहे. नाईलाजाने शेतकºयांना खराब झालेला माल फेकून द्यावा लागत आहे.

Web Title: Lockdown displaced farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.