लॉकडाऊनमुळे स्वच्छ वातावरणात पक्ष्यांच्या प्रजनन क्षमतेत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 12:46 PM2020-04-17T12:46:00+5:302020-04-17T12:46:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लॉकडाऊनमुळे कोरोनाचा संसर्ग थांबत असल्याचा चांगला निष्कर्ष समोर आला असताना दुसरीकडे पक्ष्यांच्या दैनंदिन जीवनासह ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : लॉकडाऊनमुळे कोरोनाचा संसर्ग थांबत असल्याचा चांगला निष्कर्ष समोर आला असताना दुसरीकडे पक्ष्यांच्या दैनंदिन जीवनासह शारिरिक क्षमतांवर चांगले परिणाम झाल्याचा दावा करण्यात येत आह़े याचा पुरावा म्हणजे नंदुरबार शहरात पॉलेटेकिAक कॉलेजमध्ये घुबडाच्या पाच अंडय़ांमधून पाच पिले बाहेर आले असून सर्वाची प्रकृती ही उत्तम आह़े
होळतर्फे हवेली शिवारातील पॉलिटेकिAक कॉलेजमध्ये पाच घुबड अंडय़ातून बाहेर आल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना देण्यात आली होती़ त्यांनी सहायक वनसंरक्षक जी़आऱरणदिवे यांच्यासह पथकाने तातडीने याठिकाणी भेट देत महाविद्यालयाच्या एका खोलीत असलेल्या पाचही पिंलांना ताब्यात घेतले होत़े तपकिरी रंगाच्या या पाचही घुबडांची प्रकृती चांगली असल्याचे यावेळी दिसून आल़े यावेळी वनविभागाचे अलर्ट फाउंडेशनचे आकाश जैन हेही होत़े त्यांनी घुबडांची पाहणी केली होती़ दरम्यान पाचही पक्ष्यांना वनविभागाच्या कार्यालयात आणून तेथे पशुवैद्यकीय अधिका:यांकडून तपासणी करुन घेण्यात आली़ या पक्षांना सध्या ठाणेपाडा ता़ नंदुरबार येथील रोपवाटिकेत निरीक्षणाखाली ठेवण्यात आले असून त्याठिकाणी अन्न व पाण्याचा पुरवठा करण्यात येत आह़े पिंगळा वंशातील घुबड अनेक समज आणि गैरसमजांचा धनी आह़े यातून या पक्ष्यांचे अस्तित्त्व गेल्या काही वर्षात धोक्यात आले आह़े नोव्हेंबर ते मार्च या कालावधीत मादी घुबड अंडी देत़े पांढ:या रंगाच्या या अंडय़ांमधून बाहेर येणारे पक्षी किमान 11 महिन्यात पूर्णपणे मोठे होतात़ सध्या वाचवण्यात आलेले पाचही पक्षी अडीच महिन्यांचे आहेत़ पूर्णक्षमतेने वाढ झाल्यावर त्यांची उंची 21 सेंटीमीटर्पयत वाढू शकत़े वातावरणातील पोषक बदलांमुळे पाचही पक्षी अडीच महिने सुस्थितीत राहिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आह़े घुबडाचा प्रजनन दरच कमी असल्याने सध्या वातावरणातील स्वच्छ आणि कमी झालेला डिस्र्टबन्स अर्थात ध्वनी आणि इतर बाबींचा व्यत्यय यामुळे हे पक्षी चांगल्या क्षमतेने वाढले असावेत असा वनविभागाचा अंदाज आह़े प्रजनन क्षमतेबाबत वनविभागाने केलेला दावा फोल नसल्याची अनेक कारणे सध्या जिल्ह्यातील विविध भागातून समोर येत आह़े यात प्रामुख्याने पक्ष्यांचा संचार वाढणे, नागरिकांच्या पडीक घरे आणि शेतांच्या जागेत अंडी मिळणे तसेच पिंले दिसून येत असल्याची माहिती आह़े वनविभागाने लॉकडाऊन काळात नागरिकांच्या माहितीवरुन तब्बल 11 मांडूळ जातीचे सर्प जप्त करुन जंगलात सोडून दिले आहेत़ पक्ष्यांचीही माहिती दिल्यानंतर तेथे पथक पोहोचून बचाव कार्य करत आहेत़