‘आपले सरकार’साठी सेतू केंद्रांना कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2018 12:30 PM2018-06-03T12:30:00+5:302018-06-03T12:30:00+5:30

ऑनलाईन पोर्टलवर भर : दाखले व कागदपत्रांसाठी फिरफिर होण्याची शक्यता

Locked bridge centers for 'our government' | ‘आपले सरकार’साठी सेतू केंद्रांना कुलूप

‘आपले सरकार’साठी सेतू केंद्रांना कुलूप

Next

मनोज शेलार । 
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शासनाने सर्वच सेतू केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे आता थेट ‘आपले सरकार’ आणि महाईसेवा केंद्रावर अवलंबून राहावे लागणार आहे. राज्याच्या माहिती संचालनालयाने हे आदेश काढले आहेत. दरम्यान, ऐन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या तोंडावरच सेतू केंद्र बंद झाल्याने विद्याथ्र्याना विविध दाखले, कागदपत्रांची अडचण होण्याची शक्यता व्यक्त केल जात आहे. 
राज्यातील प्रत्येक तहसील कार्यालयांच्या आवारात सेतू सुविधा केंद्र सुरू केले होते. यामुळे वेळेत दाखले किंवा कागदपत्रे मिळून नागरिकांची फिरफिर थांबली होती. शिवाय आर्थिक बचतदेखील झाली होती. सेतू सुविधा केंद्रांबाबत काहीवेळा तक्रारीही वाढल्या होत्या. त्या वेळोवेळी प्रशासनाने दूरदेखील केल्या. परंतु 1 जूनपासून राज्यातील सर्वच सेतू सुविधा केंद्र बंद करण्याचा आदेश राज्याच्या माहिती संचालनालयाने अर्थात डीआयटी काढला आहे. नंदुरबारातील सर्वच सेतू केंद्रांलाही कुलूप लागले आहे.
‘आपले सरकारवर’ भर
शासनाने गेल्या वर्षापासून आपले सरकार हे पोर्टल सुरू केले आहे. त्यावर सर्वच प्रकारचे दाखले उपलब्ध आहेत. त्यासाठी प्रत्येक तालुक्याचे ठिकाण, अनेक ग्रापपंचायतींमध्ये आपले सरकार केंद्रदेखील सुरू आहे. या माध्यमातूनच आता प्रत्येकाला विविध कागदपत्रे आणि दाखले मिळविण्यासाठी शासन प्रय}शील आहे. त्यासाठी काही ठरावीक कालमर्यादादेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. आपले सरकार या उपक्रमाचा जास्तीत जास्त नागरिकांनी उपयोग घ्यावा हा उद्देश सेतू सुविधा केंद्र बंद करण्यामागे असल्याचेही बोलले जात आहे. आपले सरकार पोर्टलवर पाचशेपेक्षा अधीक दाखले, कागदपत्र मिळू शकतात. मोबाईलवरील अॅप्स द्वारेदेखील दाखला, कागदपत्रासाठी नोंदणी करता येते.महाईसेवा केंद्रांवर आता या निर्णयामुळे अधिक भार वाढणार आहे. तहसील कार्यालयातून काही कागदपत्रे, दाखले आता सेतूप्रमाणे महाईसेवा केंद्रांकडेदेखील पाठविण्यात येणार आहेत. त्यामुळे महाईसेवा केंद्रांवर अधिक भार वाढणार आहे. मोठय़ा शहरांमध्ये दोन ते तीन तर लहान शहर व गावांमध्येदेखील एक किंवा दोन महाईसेवा केंद्र सुरू आहेत. येत्या 10 दिवसात शैक्षणिक सत्र सुरू होणार आहे. शिवाय विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे वेळापत्रकदेखील लवकरच सुरू होणार आहे. त्यासाठी लागणा:या कागदपत्रांकरीता नागरिकांच्या, विद्याथ्र्याच्या तहसील कार्यालयाच्या चकरा वाढू लागल्या आहेत.आपले सरकार पोर्टलवरून विविध कागदपत्र मिळविणे, तक्रारी करणे यासाठी काही ऑनलाईंन प्रक्रिया आहेत. ग्रामिण किंवा आदिवासी दुर्गम भागातील प्रत्येकाला ते जमेलच असे नाही. शिवाय सर्वच ग्रामपंचायतीत सेवा केंद्र आहेत असेही नाही. त्यामुळेदेखील अडचणी येऊ शकतात. परिणामी याबाबत नागरिकांना परिपूर्ण माहिती होणे आवश्यक आहे.
 

Web Title: Locked bridge centers for 'our government'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.