घरफोडीत एक लाखांचे दागिने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 12:23 PM2017-10-09T12:23:08+5:302017-10-09T12:23:08+5:30
तळोदा येथील घटना : पर्यटनासाठी केरळला जाणे पडले महाग
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : तळोदा येथील मोती बँकेचे मॅनेजर नितीन वाणी यांच्या घरावर चोरटय़ांनी डल्ला मारत एक लाख 20 हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लांबविल्याची घटना शनिवारी रात्री घडली.
शहरातील वाणी गल्ली येथे वास्तव्यास असलेले नितीन वाणी हे केरळ येथे पर्यटनासाठी गेले होत़े गेल्या काही दिवसांपासून घराला कुलूप असल्याचे पाहत चोटय़ांनी संधी साधली़ दाराचे कुलूप तोडत घरातून सुमारे एक लाख 20 हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास करण्यात आल़े या वेळी चोरटय़ांकडून घरातील इतरही सामान अस्ताव्यस्त करण्यात आला होता़ नितीन वाणी यांचे काका विजय वाणी यांना चोरीची घटना समजताच त्यांनी नितीन यांच्याशी दुरध्वनीव्दारे संपर्क साधला व घटनेची कल्पना दिली़
श्वान पथकाला पाचारण
चोरीची घटना घडल्यानंतर घटनास्थळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आल़े परंतु श्वानाकडून शहरातील कालिका देवी गल्लीर्पयतच चोरटय़ांचा माग काढण्यात आला़ त्यामुळे चोरटे याच मार्गाने पुढे मार्गस्थ झाले असल्याचा अंदाज पोलिसांकडून बांधण्यात आला़ दरम्यान, नितीन वाणी यांच्या फियार्दीवरुन गुन्ह्याची नोंद करण्यात आली आह़े पुढील तपास फौजदार यादव भदाणे करीत आहेत़