चांदसैली घाटात भाविकांचे वाहन पलटी लोकमत न्यूज नेटवर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 10:52 AM2018-09-04T10:52:21+5:302018-09-04T10:52:27+5:30

Loksite news network turns into vehicles in Chandsaili Ghat; | चांदसैली घाटात भाविकांचे वाहन पलटी लोकमत न्यूज नेटवर्क

चांदसैली घाटात भाविकांचे वाहन पलटी लोकमत न्यूज नेटवर्क

Next

कोठार :  रंजनपूर येथील संत गुलाम बाबांच्या  दिंडीत सहभागी होण्यासाठी येणा:या भाविकांची जीप चांदसैली घाटात पलटी झाल्याची घटना सोमवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. यात बारा जण जखमी झाले असून त्यातील चार जण गंभीर जखमी असून त्यांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. 
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धडगाव कुंडल येथील भाविक शेवटच्या श्रावण सोमवारनिमित्त संत गुलाम महाराज यांच्या चौपळे येथून निघणा:या दिंडीत सहभागी होण्यासाठी जीप गाडीने निघाले होते. त्यांची गाडी कोठार ते चांदसैली दरम्यानच्या घाटात असताना चालकाला रस्ताच्या अंदाज न आल्याने गडावरील ताबा सुटून ती पलटी झाली. या अपघात हुण्या सोमा पाडवी (रा.खांडबारा), आहलीबाई रावला पाडवी, जात्र्या फुल्या पाडवी, गुलाब रावला पाडवी हे गंभीर जखमी झाले. जखमींना नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. तर या अपघातातील अन्य जखमीमध्ये भागिराम बासरा पाडवी(55), भगतसिंग उस:या पाडवी(56), किशोर खेमा पाडवी(11), रावल्या तेज्या पाडवी(चालक) (रा.सर्व कुंडल) प्रताप गिम्ब्या वळवी(30), खेमजी पुण्या वळवी(32) (रा.कात्री), किसन कामा वसावे(30),गोवल्या बाया पाडवी(60) (रा.खांडबारा) यांचा समावेश आह़े यांना तळोदा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. भागिराम बासरा पाडवी यांच्या फिर्यादीवरुन जीप चालकाविरुद्ध तळोदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल जगलसिंग वसावे व पोलीस कॉन्स्टेबल तारसिंग वसावे हे करीत आहेत.
तळोदा ते धडगाव दरम्यान चांदसैली घाटमार्गे मोठय़ा प्रमाणात जीवघेणी अवैध प्रवासी वाहतूक केली जाते. गाडीच्या टपावर 8 ते 10  प्रवासी बसलेले असतात. तर गाडीच्या आजूबाजूला देखील अनेक प्रवाशी लटकलेले असतात. वाहनातसुध्दा अनेक प्रवाशी शेळ्या मेंढय़ा सारखे कोंबलेले असतात. याकडे पोलीस यंत्रणेकडून कानाडोळा केला जात असल्याचा आरोप करण्यात येत      आह़े
 

Web Title: Loksite news network turns into vehicles in Chandsaili Ghat;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.