‘लाँग रुट’ला होतेय तोबा गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 01:08 PM2018-04-28T13:08:14+5:302018-04-28T13:08:14+5:30
वाहतूक व्यवस्थेवर ताण : उन्हाळी सुटय़ांमुळे परिणाम, बसेफे-या वाढवाव्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सर्वत्र लगअसराई तसेच उन्हाळी सुटय़ांची धूम असल्याने यामुळे वाहतूक व्यवस्थेवर मोठय़ा प्रमाणात ताण पडत आह़े लॉन्ग रुट च्या एसटी बसेसमध्ये प्रवाशांची तोबा गर्दी होत आह़े आधिच वाढते तापमान आणि त्यात एसटीमध्ये प्रवास करीत असताना होत असलेली प्रवाशांची चेंगराचेंगरी जिवावर आली असल्याच्या भावना प्रवाशांकडून व्यक्त होत आहेत़
वाहतूक व्यवस्थेवर ताण निर्माण होत असल्याने एसटी महामंडळातर्फे हंगामी स्वरुपात जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आह़े परंतु तरीदेखील दिवसागणिक वाढत्या प्रवासी संख्येने बसेसची संख्या तोटकी पडत असल्याचे दिसून येत आह़े
नंदुरबार आगाराकडून सूरत, उदना, औरंगाबाद, शिर्डी, नाशिक, पुणे आदी मार्गावर सुमारे आठ अतिरिक्त बसेसचे नियोजन केले आह़े त्यात, सूरत-उदना 2, औरंगाबाद 2, शिर्डी 1, नाशिक 2 तर पुण्यासाठी एका बसचे शेडय़ुल्ड आह़े
दरम्यान, अक्कलकुवा आगाराकडून कल्याण सकाळी साडेसहा, वाशिम सकाळी साडेपाच तर दुपारी 12 वाजता पुणे गाडी सोडण्यात येत आह़े शहादा आगाराकडून सकाळी 7 ला शहादा-मुंबई, शहादा-जामनेर, साडेआठ वाजता शहादा-वापी, शहादा-साक्री, सकाळी 11 वाजता शहादा-पुणे, सायंकाळी साडेपाचला शहादा-बडोदा, रात्री 8 वाजता शहादा-धुळे मुक्कामी बस सोडण्यात येत आह़े
गेल्या काही दिवसांपासून लगअसराईचा धुमधडाका सुरु आह़े त्यामुळे मोठय़ा संख्येने प्रवाशांची वाहतूक वाढली आह़े ही परिस्थिती लक्षात घेता एसटी महामंडळाकडून हंगामी स्वरुपावर अतिरिक्त बसेसचे नियोजन करण्यात आले आह़े जिल्ह्यातील लोकल बस बरोबरच लांब पल्ल्यांच्या बसफे:यांमध्येही वाढ करण्यात आली आह़े
प्रवासी झाले बेजार
जिल्ह्याच्या तापमानात दिवसागणिक मोठी वाढ होत आह़े त्यामुळे साहजिक उकाडासुध्दा जाणवत आह़े परंतु लगअसराईनिमित्त विविध गावांना जाणेदेखील गरजेचे असत़े त्यातच एसटीमधून धक्काबुक्की करत प्रवास करावा लागत असल्याने प्रवासी चांगलेच बेजार झाले आहेत़ भर उन्हात प्रवास करताना प्रवाशांच्या अंगावर अक्षरश काटा उभा राहत असल्याचे बोलले जात आह़े खाजगी वाहनांची मोठय़ा प्रमाणात भाडेवाढ झाली आह़े त्यामुळे सर्वसामान्यांना हे दर परवडणारे नसल्याने त्याना साहजिकच एसटी बसेसनेच प्रवास करावा लागत आह़े
एसटी महामंडळ मालामाल
कमी भारमानामुळे महसुली उत्पन्नात तोटा सहन करीत असलेल्या एसटी महामंडळाला उन्हाळी सुटय़ा तसेच लगअसराईनिमित्त वाढलेल्या प्रवासी संख्येने नवसंजीवनी मिळत असल्याचे बोलले जात आह़े वाढत्या प्रवासी संख्येने एसटी बसेसच्या फे:यांमध्ये वाढ करावी लागत आहे तर दुसरीकडे भाडे करारावरही एसटी बसेस लगअसराईसाठी वापरल्या जात असल्याचे महामंडळाकडून सांगण्यात आले आह़े
एसटी महामंडळाच्या अनेक लाल बसेस भाडय़ाने देण्यात आलेल्या आहेत़ 42 रुपये पर किलोमीटर दराने बसेस भाडय़ाने दिल्या जात आहेत़
शिवशाहीला मिळतेय पसंती
एसटी महामंडळाच्या लाल बसेस सोबतच शिवशाहीलाही मोठी पसंती मिळत आह़े अनेक एसी, आरामदायक आसन व्यवस्था असल्याने ह्यलक्झरीयसह्ण प्रवास करण्यासाठी शिवशाहीला प्राधान्य देण्यात येत आह़े यासाठी वेळ प्रसंगी दोन पैसे जादा मोजण्याचीही तयारी प्रवाशांकडून करण्यात येत आह़े
नाशिक मार्गावर गर्दी
नाशिकसह औरंगाबाद, सूरत-उदना, पुणे, कल्याण आदी मार्गावरील बसेसमध्ये तुफान गर्दी होत असल्याचे दिसून येत आह़े त्यामुळे या मार्गावरील बसफे:यांमध्ये अधिक वाढ करण्यात यावी अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आह़े
बसायलाही जागा नाही
अनेक वेळा बसेसमध्ये लांबवरच्या प्रवासात प्रवाशांच्या गर्दीमुळे बसायला तर सोडा पण उभ राहण्यालासुध्दा जागा नसल्याचे दिसून येत आह़े
यात वयोवृध्दांचे मोठय़ा प्रमाणात हाल होत असल्याचे दिसून येत आह़े अनेक वेळा तर आसन मिळविण्याच्या स्पर्धेत प्रवाशांकडून धक्काबुक्कीदेखील करण्यात येत असल्याचे दिसून येत आह़े आगारात बस प्रवेश करते वेळीच बसच्या खिडकीतून बॅग तसेच रुमाल टाकून जागा मिळवण्यासाठी धडपड करण्यात येत असत़े