लोणखेडा चौफुलीवर वाहतुकीची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 01:09 PM2018-07-23T13:09:40+5:302018-07-23T13:09:53+5:30

रस्त्याच्या कामामुळे समस्या : वाहनधारक त्रस्त, उपाययोजना करण्याची गरज

Lonkheda traffic congestion | लोणखेडा चौफुलीवर वाहतुकीची कोंडी

लोणखेडा चौफुलीवर वाहतुकीची कोंडी

googlenewsNext

रस्त्याच्या रुंदीकरणामुळे शहादा ते खेतिया रस्त्यावरील लोणखेडा चार रस्त्यावर वारंवार वाहतुकीची कोंडी होत आहे. या कोंडीमुळे वाहनधारक अक्षरश: वैतागले असून पर्यायी उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
सध्या कोळदा ते खेतिया दरम्यान रस्त्याचे रुंदीकरणाचे काम जोरात सुरू आहे. या रस्त्यादरम्यान गोमाई नदी असून या नदीवर दुहेरी पूल बांधण्यात आले आहे. परंतु रस्त्याच्या कामामुळे एका बाजूला चर खोदला आहे. त्यामुळे एकाच पुलावर वाहतूक सुरू आहे. त्यामुळे वाहनचालकांना तारेवारची कसरत करून वाहन चालवावे लागते. त्यातच लोणखेडा येथील बसथांब्याजवळ चार रस्ते एकाच ठिकाणी मिळत असल्याने वाहनांची नेहमी वर्दळ असते. प्रवाशांनाही जीव मुठीत घेऊन वाहन पकडावे लागते. लोणखेडा येथील बसथांब्याजवळ शहादा बायपास, सातपुडा साखर कारखाना, कवळीद, मलोणी व शहादा येथून येणारे रस्ते आहेत. मध्य प्रदेशाला जोडणारा हा एकमेव मार्ग असल्यामुळे या मार्गावर वाहनांची मोठय़ा प्रमाणावर ये-जा सुरू असते. महाविद्यालय जवळच असल्याने विद्याथ्र्याचीही चौफुलीवर बस पकडण्यासाठी गर्दी असते. त्यातच बेशिस्तपणे वाहने चालविणा:यांची भर पडून वाहनचालक व प्रवाशांना ते त्रासदायक ठरत आहे. लोणखेडा येथील चार रस्त्यावर सध्या रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहने निघण्यासाठी जागा कमी आहे. वाहने काढण्यासाठी वाहनधारकांना तारेवरची कसरत करून वाहने काढावी लागत आहे. त्यामुळे या मार्गावर एक ते दीड तास वाहन काढण्यासाठी लागतो. या चौफुली परिसरात वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचा:यांची कायमस्वरुपी नेमणूक करून चौफुलीवर बेशिस्त वाहतूक रोखण्यासाठी व प्रवाशांचे व विद्याथ्र्याचे होणारे हाल थांबविण्याची मागणी होत आहे.
 

Web Title: Lonkheda traffic congestion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.