शहाद्यातील सेतू केंद्रात विद्याथ्र्याची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 12:54 PM2017-09-27T12:54:32+5:302017-09-27T12:54:32+5:30
नियमापेक्षा जादा रकमेची मागणी : महसूल विभागाने लक्ष घालण्याची गरज
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्राrाणपुरी : शैक्षणिक कामकाजासाठी आवश्यक असलेले विविध प्रकारचे दाखले काढण्यासाठी शहादा येथील माहिती व सेतू सुविधा केंद्रातील कर्मचारी विद्याथ्र्याकडून जादा पैसे वसुल करीत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. नियमानुसार शुल्क भरल्यानंतरही दस्तावेज देताना पैशांची मागणी करण्यात येत असल्याचा प्रकार या सेतू केंद्रात राजरोसपणे सुरू असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
दहावी-बारावीनंतर विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी व प्रवेशित झालेल्या विद्याथ्र्याना विविध शासकीय दाखल्यांची गरज असते. दाखल्यासाठी लागणारी कागदपत्रे जमा करताना नियमानुसार असलेले शुल्क जमा करण्यात येते. त्यातही विविध दाखले व इतर दस्तावेजासाठी वेगवेगळी रक्कम आकारली जाते. एखाद्या दाखल्याचे 32 रुपये शुल्क असेल तर विद्यार्थी किंवा पालक 35 रुपये देतात. त्यानंतर सुटे नसल्याचे कारण पुढे करून उरलेले तीन रुपये ब:याच नागरिकांना परत देण्यात येत नाहीत. दाखल्यासाठी लागणारे शुल्क भरल्यानंतर पावती देण्यात येते. या पावतीत दाखला कधी मिळेल ते नमूद केलेले असते. दिलेल्या तारखेला किंवा वेळेला विद्यार्थी दाखला घेण्यासाठी सेतू सुविधा केंद्रात गेल्यानंतर परत 10 रुपयांची मागणी करून लूट करण्यात येत आहे. प्रस्तुत प्रतिनिधीने याबाबत संबंधित कर्मचा:याला विचारणा केली तर आम्हाला प्रिंटरचा खर्च काढावा लागतो, असे उत्तर देण्यात येते.
नियमापेक्षा जादा शुल्क घेण्यात असल्याच्या प्रकाराबाबत नायब तहसीलदारांना विचारले असता त्यांनी सांगितले की, दाखले देण्यासाठी नियमाप्रमाणे 32 रुपये शुल्क आकारल्यानंतर पुन्हा पैसे मागण्याची गरज नाही. याबाबत चौकशी करून कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.
एकीकडे शासनाच्या महसूल विभागातर्फे महाराजस्व अभियान राबवून विद्यार्थी व नागरिकांना विविध दाखले गावोगावी जाऊन मोफत वाटप करण्यात येतात. तर दुसरीकडे सेतू सुविधा केंद्रात त्याच दाखल्यांसाठी जादा रक्कम घेऊन लूट करण्यात येत असल्याचा प्रकार सुरु असल्याने त्याबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. याबाबत जिल्हाधिका:यांनी तातडीने लक्ष घालून हा प्रकार थांबविण्याची गरज आहे.