नर्मदा खो:यातील सर्वच धरणे रिकामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 05:54 PM2017-09-21T17:54:10+5:302017-09-21T17:54:10+5:30
सरदार सरोवर भरण्याची प्रतिक्षा : साडेआठ मिटर पाण्याची पातळी खाली
रमाकांत पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : महाकाय सरदार सरोवर प्रकल्पाचा जलपूजनानंतर देशभरात लक्षवेधी ठरलेल्या नर्मदा खो:यातील सर्वच्या सर्व आठ प्रकल्प अद्याप रिकामेच आहेत. दरम्यान, याच खो:यातील सर्वात शेवट असलेला सरदार सरोवर प्रकल्प अद्यापही साडेआठ मिटरने खाली असून तो भरण्याकडे सर्वाचे लक्ष लागून आहे.
तब्बल 56 वर्षानंतर गेल्या 17 सप्टेंबरला जगातील दुसरा मोठा प्रकल असलेल्या सरदार सरोवर प्रकल्पाचे जलपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. या प्रकल्पामुळे विस्थापीत होणा:या महाराष्ट्रातील काही आणि मध्यप्रदेशातील सुमारे 40 हजार बाधितांचे पुनर्वसन बाकी असतांना त्याचे जलपूजन झाल्याने सर्वाचेच लक्ष नर्मदा खो:याकडे लागले आहे. खास करून सरदार सरोवर प्रकल्प त्याची उंची वाढवावी कि कमी करावी याबाबत यापूर्वीच वादातीत ठरला आहे. या वादातही प्रकल्पाची उंची 138.68 मिटर्पयत पुर्ण वाढविल्याने सर्वानाच तो भरण्याची प्रतिक्षा आहे. कारण यापूर्वी सरदार सरोवर प्रकल्पावर गेट बसविण्यापूर्वी त्या ठिकाणी 131 मिटर्पयत पाण्याची पातळी वाढली होती. धरण पुर्ण झाल्यानंतर ते भरल्यास त्याच्या पाणलोटात किती भागाला धोका पोहचू शकतो याचे ख:या अर्थाने प्रत्यक्षात चित्र समोर येणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प पुर्ण भरल्यानंतर सर्वाना त्याचे उत्तर मिळणार आहे. पण त्यासाठी अजून महिनाभर तरी प्रतिक्षा करावी लागेल असे चित्र आहे. शिवाय पाऊस न झाल्यास यंदा प्रकल्प भरेल की नाही याबाबत साशंकताच आहे. कारण सद्य स्थितीत नर्मदा खो:यातील सर्व आठ प्रकल्प अजूनतरी भरलेले नाही. या खो:यात सुरुवातीला असलेला बर्गी प्रकल्पाची उंची 422.76 मिटर असून त्यात सद्यस्थितीत 420.05 मिटर पाणीसाठा आहे. तर बुरमनघाट प्रकल्प 322 मिटरपैकी 308.24 मिटर भरला आहे. तवा प्रकल्पाची उंची 355.40 मिटर असून त्यात 350.34 मिटर पाणीसाठा आहे. इतर प्रकल्पांची स्थिती अशी कंसात धरणाची एकुण उंची मिटरमध्ये- होशांगाबाद (293.83) 285.35 मिटर, आयएसपी रिझरव्हायर (162.3) 252.07, ओएसपी रिझरव्हायर (196.60) 190.98, मंडलेश्वर (157.29) 142.30. सर्वच प्रकल्पात दोन ते 15 मिटरने अद्याप खाली आहेत. सरदार सरोवर प्रकल्पाची उंची गेट बसल्यानंतर 138.68 असून त्यात सद्यस्थितीत 130 मिटर पाणीसाठा आहे.