नंदुरबार जिल्ह्यात कापूस-मिरचीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 01:17 PM2017-08-09T13:17:15+5:302017-08-09T13:17:50+5:30

शेतकरी चिंतीत : अज्ञात व्यक्तीने झाडे कापली

Loss of cotton and pepper in Nandurbar district | नंदुरबार जिल्ह्यात कापूस-मिरचीचे नुकसान

नंदुरबार जिल्ह्यात कापूस-मिरचीचे नुकसान

googlenewsNext
ठळक मुद्देशेतक:यांमध्ये खळबळ कापसाची किमान 500 झाडे तोडून नुकसान अडीच एकराच्या क्षेत्रात लागवड

ऑनलाईन लोकमत

नंदुरबार, दि. 9-   तालुक्यातील खोडसगाव शिवारात अज्ञात व्यक्तीने मिरची आणि कापसाची झाडे कापून फेकल्याचा प्रकार उघडकीस आला आह़े यामुळे शेतक:यांमध्ये खळबळ उडाली आह़े 
खोडसगाव-शिंदे रस्त्यालगत मगन रामदास पाटील यांच्या आठ क्षेत्रात कापूस तर अडीच एकरात मिरची लागवड करण्यात आली आह़े मंगळवारी सकाळी मगन पाटील हे शेतात गेले असता, त्यांना कापसाची झाडे अज्ञात व्यक्तीने तोडून शेतातच टाकल्याचे दिसून आल़े कापसाची किमान 500 झाडे तोडून नुकसान केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले होत़े त्यांनी शेतात पाहणी केली असता, अडीच एकराच्या क्षेत्रात लागवड केलेल्या मिरचीच्या 250 झाडांची स्थिती दयनीय होती़ ऐन हिरवी मिरची तोडीवर आलेल्या असताना झाडांची नासधूस करण्यात आली़ यामुळे शेतक:याचे मोठे नुकसान झाले आह़े या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शिंदे आणि खोडसगाव येथील शेतकरी याठिकाणी हजर झाले होत़े खोडसगाव शिवारात प्रथमच हा प्रकार घडल्याने शेतकरी अचंबित झाले आहेत़ 
यंदा पावसाने समाधानकारक हजेरी दिल्याने पिकांची स्थिती चांगली आह़े त्यात कापूस शेतक:यांना चांगले आर्थिक उत्पन्न देणार असल्याचे अंदाज बांधण्यात येत आहेत़ यातच झाडांची अज्ञात कारणामुळे बेसुमार तोड केल्याने शेतक:यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आह़े या प्रकाराचा छडा लावण्याची अपेक्षा आह़े 

Web Title: Loss of cotton and pepper in Nandurbar district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.