वीज तार तुटल्याने शेतातील ऊस खाक : त:हाडी शिवारातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 12:21 PM2017-12-05T12:21:16+5:302017-12-05T12:21:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
परिवर्धा : शहादा तालुक्यातील तहार्डी त.बो.येथील शेतक:याच्या शेतात मुख्य वीज वाहिनीची तार तुटून पडल्याने पाच लाख रुपयाचा ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली.
याबाबत असे की, तहार्डी येथील शेतकरी बद्रीनाथ जगन्नाथ चौधरी यांच्या तहार्डी शिवारातील गट नं. 205/1 मधील साडेचार एकर क्षेत्रात 265 जातीच्या आडसाली ऊसाची लागवड करण्यात आली होती. या परिपक्व झालेल्या ऊसाच्या तोडणीच्या वेळेसच वीज वाहिणीची मुख्य तार तुटून पडल्याने साडेचार एकरातील ऊस जळून खाक झाला. यात शेतक:याचे अंदाजे पाच लाख रुपयांर्पयत नुकसान झाल्याचे बोलले जात आहे.
परिपक्व झालेल्या ऊसाची तोडणी होणारच होती. परंतु महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणाचा फटका संबंधित शेतक:याला बसला. ऐन हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याचा प्रकार घडला आहे.
वीज वितरण कंपनी शेतक:यांच्या प्रश्नाकडे कधीच गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे बोलले जात आहे. यात वाकलेले खांब असो किंवा जीर्ण वीज तारा, ट्रान्सफार्मरच्या केबलबाबत शेतकरी नेहमीच तक्रारी करत असतो. मात्र याकडे नेहमीच वीज वितरण कंपनी दुलक्र्ष करत असते. त्याचा फटका शेतक:यांना बसतो. याबाबत महसूल व पोलीस प्रशासनाकडून पंचनामा करण्यात आला आहे.
या वेळी वीज वितरण कंपनीने झालेल्या नुकसानीची भरपाई करून द्यावी, अशी मागणी संबंधित शेतक:यांकडून करण्यात येत आहे.