दलित-आदिवासी संघटनांकडून बंद, शहाद्यात दगडफेकीच्या घटनेत चार बसेसचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 12:16 PM2018-04-02T12:16:31+5:302018-04-02T12:16:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : अनुसुचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासंबधी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर फेरयाचिका दाखल करून कायद्याला बळकटी देण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यातील विविध दलित-आदिवासी संघटना आणि आदिवासी दलित मागासवर्गीय संघर्ष समिती यांच्याकडून कडकडीत बंद पाळण्यात आला़ शहादा येथील दगडफेकीची घटना वगळता इतर भागात शांततेत बंद पाळण्यात येत आह़े
अॅट्रॉसिटी कायद्याची कठोर पूर्ववत कठोर अंमलबजावणी व्हावी यासाठी देशभर सोमवारी बंद पुकारण्यात आला़ यात जिल्ह्यातील सर्व दलित-आदिवासी संघटनांनी सहभाग घेतला़ सोमवारी मोलगी, धडगाव, अक्कलकुवा, तळोदा, नवापूर, खांडबारा, विसरवाडी, चिंचपाडा, शहादा यासह ठिकठिकाणी सकाळपासूनच दुकाने बंद होती़ बंदची माहिती रविवारी विविध संघटनांकडून देण्यात आल्याने बाजारपेठा बंद होत्या़
दरम्यान शहादा शहरात सकाळी 9़30 वाजेच्या सुमारास चार बसेसवर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली़ यात बसेसच्या काचा फूटून नुकसान झाल़े शहादा आगाराची शहादा-पाडळदा (एमएच 14-बीटी 1356), (एमएच 20-बीएल 0551) शहादा-खैरवे, (एमएच 14-बीटी 1699) मोलगी-नवापूर आणि एमएच 14-बीटी 1356 या चार बसेवर दगडफेक करण्यात आली़ यात बसेसचे 1 लाख 20 हजार रूपयांचे नुकसान झाले आह़े दगडफेकीच्या घटनेनंतर शहादा शहरातील तुरळक सुरू असलेली दुकाने तात्काळ बंद करण्यात येऊन शाळांना सुटी देण्यात आली होती़
शहादा येथे आदिवासी दलित संघर्ष समितीच्यावतीने तहसीलदार कार्यालयाजवळ धरणे आंदोलन सुरू करण्यात आल़े
नंदुरबार शहरातील विविध भागात बंदचे आवाहन करणारे संघटनांचे कार्यकर्ते आणि व्यावसायिक यांच्यात किरकोळ वाद वगळता शहरात शांततेत बंद पाळण्यात आला़