शिवशाही बसमुळे एसटी महामंडळाला लाखोंचा तोटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 12:07 PM2019-07-01T12:07:43+5:302019-07-01T12:07:50+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : महाराष्ट्र एसटी वकर्स काँग्रेसतर्फे (इंटक) शहरात कामगार मेळावा व सेवानिवृत्ताच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले ...

Loss of millions to ST corporation due to Shivsahi bus | शिवशाही बसमुळे एसटी महामंडळाला लाखोंचा तोटा

शिवशाही बसमुळे एसटी महामंडळाला लाखोंचा तोटा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : महाराष्ट्र एसटी वकर्स काँग्रेसतर्फे (इंटक) शहरात कामगार मेळावा व सेवानिवृत्ताच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होत़े मेळाव्याचे अध्यक्षस्थानी माजी आमदार जयप्रकाश छाजेड होत़े  
कार्यक्रमात बोलताना माजी आमदार छाजेड यांनी राज्य शासनाकडून एसटी महामंडळ विकण्याचा प्रयत्न होत असून शिवशाही बसमुळे एसटीला लाखो रुपयांचा तोटा झाल्याचा आरोप करुन एसटी महामंडळाची सद्यस्थिती मांडली़ कार्यक्रमास आमदार चंद्रकांत रघुवंशी, संघटनेचे सरचिटणीस मुकेश तिगोटे, संघटनेचे राज्य प्रसिद्धीप्रमुख मायाजी डोळस, संघटनेचे धुळे जिल्हाध्यक्ष प्रविण शिसोदे, धुळे विभागीय अध्यक्ष रामेश्वर चत्रे, सचिव  चंद्रकांत गोसावी, विभागीय उपाध्यक्ष एम़पी़देसले, रविंद्र बैरागी, रविंद्र पाटील, संजय पाटील, विकास गवळी, अनिल पाटील, एस़क़ेठाकरे, सी़जी़शिंपी, दिनेश नेरकर, शुभांगी शिंपी, भरत कोळी आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत़े 
कार्यक्रमात बोलताना छाजेड यांनी सांगितले की, परिवहन मंत्री दिवाकर रावते हे एसटी महामंडळाचा खेळखंडोबा करत आहेत़ एसटीची माहिती नसणारे निवृत्त अधिकारी आणून बसवत स्वत:चा फायदा करुन घेत आहेत़ कर्मचा:यांनी संप पुकारल्यानंतर एसटीची स्थिती चांगली नसल्याचे सांगणा:या महामंडळाने 1 हजार शिवशाही बसेसचा ठेका खाजगी कंपनीला दिला होता़ त्या ठेकेदाराची बँकेची पत नसल्याने त्या गाडय़ा बँकेने ओढून नेल्या होत्या़ आता पुन्हा नव्याने 400 गाडय़ांचा ठेका परिवहन मंत्र्यांनी दिला आह़े 
रावते यांच्या कार्यकाळात एसटीत सर्वात मोठा भ्रष्टाचार झाला असून 50 कोटी रुपयांचे स्वच्छता कंत्राट त्यांनी 507 कोटींना दिला असल्याचा खळबळजनक आरोपही माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांनी केला़ 
आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी एसटी कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी कटीबद्ध असल्याचे सांगितल़े 
प्रास्ताविक चंद्रकांत गोसावी यांनी केल़े सूत्रसंचालन चेतना पाटील यांनी तर आभार एम़एऩआगळे यांनी मानल़े 

कार्यक्रमात धुळे विभागातील 24 सेवानिवृत्त कर्मचा:यांचा गौरव करण्यात आला़ यावेळी त्यांचे कुटूंबियही उपस्थित होत़े दरम्यान भाषणात आमदार छाजेड यांनी शिवशाही बसेसच्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये भिती निर्माण झाली असून खाजगी ठेकेदाराच्या माणसांमुळे एसटीची पत खाली गेल्याचे सांगितल्यानंतर उपस्थित कर्मचा:यांनी घोषणा देत ठेकेदाराचा निषेध केला़ 
 

Web Title: Loss of millions to ST corporation due to Shivsahi bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.