अवकाळी पावसामुळे शहादा तालुक्यात हजारो हेक्टरवरील केळी, पपईच्या पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2023 02:34 PM2023-12-05T14:34:35+5:302023-12-05T14:34:53+5:30
गेल्या आठवड्यात जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे नुकसानीचे प्रमाण वाढले आहे.
नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील बागायतदार शेतकऱ्यांना पूर्णपणे उध्वस्त केल्याचे चित्र आहे. शहादा तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले असून अवकाळी झालेल्या पावसाने शेकडो हेक्टरवरील केळी पपईच्या बागा उद्ध्वस्त झालेल्या आहेत. तर हजारो एकर क्षेत्रावर नुकसान झाले आहे.
गेल्या आठवड्यात जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे नुकसानीचे प्रमाण वाढले आहे. यामुळे नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सर्वात जास्त फटका शहादा तालुक्याला बसला असून यात पपई आणि केळीच्या बागा पूर्णतः उध्वस्त झाल्या आहेत. पंचनामे करून सरसकट मदतीची शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. तर दुसरीकडे सरकारच्या वतीने पंचनामे सुरू केले असले तरी मदत मिळणार कधी? अशी आशी शेतकऱ्यांना लागून आहे.