जून महिन्यात गेल्या वर्षाच्या तुलनेत नंदुरबार जिल्ह्यात कमी पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 01:09 PM2018-06-30T13:09:40+5:302018-06-30T13:10:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात यंदा उशिराने पावसाने हजेरी लावली आह़े गेल्या वर्षी संपूर्ण जून महिन्यात 14 तर यंदा मात्र केवळ 13 टक्के पावसाने हजेरी लावली आह़े यातही 6 जूनपासून पावसाचे 16 दिवस कोरडे असल्याने केवळ 8 दिवसच पाऊस झाल्याचे स्पष्ट होत आह़े
सरासरी 835़ 83 मिलीमीटर पाऊस नंदुरबार जिल्ह्यात होतो़ यंदा मान्सूनचे आगमन वेळेवर होऊनही जिल्ह्यात मान्सूनचा पहिला पाऊस हा 6 जून रोजी कोसळला होता पहिल्या दिवशी संपूर्ण जिल्ह्यात सरासरी 12़83 मिलीमीटर पाऊस झाला होता़ यानंतर तब्बल 16 दिवसांच्या खंडाने जिल्ह्यात पाऊस झाला होता़ यातुलनेत गेल्या वर्षात पहिला पाऊस हा 9 जून रोजी आल्याचे सांगण्यात आले आह़े तर 29 जून 2017 र्पयत 124़83 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती़ महिन्यातील 10 दिवसांपेक्षा अधिक काळ कोसळलेल्या या पावसाची टक्केवारी ही 14़93 टक्के होती़ त्या तुलनेत जिल्ह्यात यंदाच्या वर्षात 13़82 टक्के पाऊस झाला आह़े गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असल्याने शेतीकामांना वेग आला आह़े यंदाच्या पावसाळ्यात 29 जूनर्पयत नंदुरबार 90, नवापूर 62, शहादा 135, तळोदा 142, अक्कलकुवा 140 तर धडगाव तालुक्यात 124 मिलीमीटर अशा एकूण 693 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आह़े जिल्ह्याची एका महिन्याची सरासरी ही 115 मिलीमीटर आह़े गेल्यावर्षातील जून महिन्यात सरासरी 124़ 83 मिलीमीटर पाऊस कोसळला होता़ पावसाचे दिवस जून महिन्यात कमी झाल्याचे हवामान खात्याने कळवले आह़े