टर्कीकरांना भावला महाराष्ट्रीयन पेहराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 11:55 AM2018-12-13T11:55:33+5:302018-12-13T11:55:36+5:30

नव्वारीचे आकर्षण : प्रितम-प्रिशा यांचा वैदिक पध्दतीने विवाह

Maharakshian Pahrawa to the students | टर्कीकरांना भावला महाराष्ट्रीयन पेहराव

टर्कीकरांना भावला महाराष्ट्रीयन पेहराव

Next

तळोदा : तळोदा येथील प्रितम तर टर्कीतील प्रिशा यांचा बहुचर्चित विवाह समारंभ तळोदा येथे साध्या पध्दतीने पार पडला़ या वेळी वधु पक्षातील लोकांना तळोदेकरांचा पाहुणचार व महाराष्ट्रीय पेहराव चांगलाच भावल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आल़े बुधवारी दोघेही वैदीक पध्दतीने विवाहबंधनात अडकल़े 
तळोदा शहरातील सूर्यकांत राजकुळे यांचे सुपूत्र प्रितम व टर्की येथील उसल ओजगेन यांची कन्या प्रिशा हांडे यांची भेट आर्यलंड येथे झाली़ दोघेही शास्त्रज्ञ म्हणून एकाच ठिकाणी काम करीत असताना ऐकमेकांशी परिचय झाला़ परिचयाचे रुपांतर प्रेमात होऊन दोघांनीही विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला़ दोघींनी आपआपल्या आई-वडीलांना याची माहिती देत विवाहाचा प्रस्ताव ठेवला़ परिवारांनीही तत्काळ यास होकार भरत विवाहाला संमती दिली़ त्यानुसार बुधवारी तळोद्यातील बहुचर्चित विवाह पार पडला़ प्रिशा हांडे यांचे वडील उसल ओजगेन सिव्हिल इंजिनियर म्हणून टर्की येथे सेवानिवृत्त झाले आहेत़  हांडेचे कुटुंबिय मानवता हाच धर्म मानणारे असल्याने त्यांना भारतीय संस्कृतीचे आधीपासून आकर्षण, आदर व प्रेम होतेच यातून दोघांचे कुटुंब एकत्र आले व दोन्ही कुटुंबीयांनी आपल्या मुला-मुलींचा विवाह एक  वर्षापूर्वी निश्चित केला़ त्या नुसार हा विवाह सोहळा तळोदा येथे 12 डिसेंबर रोजी त्यांच्या राहत्या घरी घटिका मुहूर्तावर वैदिक पद्धतीने झाला़ तर 13 डिसेंबर रोजी रिसेप्शन सोहळा होणार आह़े 
त्या आधी वधू-वराची वरात सजवलेल्या बग्गीतून तळोदा शहरातून काढण्यात येणार आह़े या विवाह सोहळ्यासाठी वधूचे  अमेरिका, कॅनडा, जपान व टर्कीमध्ये राहणारे नातेवाईक व दोघांचे मित्र-मैत्रिणी तळोद्यात आले होत़ेप्रिशा तसेच त्यांचे नातलग यांनी खास पध्दतीचा महाराष्ट्रीय पेहराव परिधान केला होता़ प्रिशा यांच्यासह सर्व महिलांनी नव्वारी साडी व भगवा फेटा घालून उपस्थितांचे लक्ष वेधले होत़े हा खास महाराष्ट्रीयन पेहराव पाहून सर्वानाच त्याचे कुतूहल वाटत होत़े 

Web Title: Maharakshian Pahrawa to the students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.