एक कोटी हो या पाच कोटी, बोलने में क्या हर्ज...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 11:13 AM2022-12-19T11:13:15+5:302022-12-19T11:16:18+5:30
घोडे विक्रेत्यानेच केली घोडे बाजारातील घोड्यांच्या किमतीची पोलखोल केली.
रमाकांत पाटील
नंदुरबार : ‘साहब, दस साल हो गये ये धंदे मे, मेरे पास २०० घोडे है, देशभर के मेले घूमा हूँ, मैने तो ना कभी एक कोटी का घोडा देखा है, ना बिका हुआ सुना है... ये तो बस्स गॉसिप है... लोगो की जुबा पे क्या हड्डी है, बोलने में क्या हर्ज हैं...’ घोडे विक्रेते रमेश सिंह यांनीच घोडे बाजारातील घोड्यांच्या किमतीची पोलखोल केली. घोड्यांच्या किमती या केवळ प्रसिद्धीसाठीचा स्टंट असल्याचेही त्यांनी सांगितले.
सारंगखेडा येथील घोडे बाजारात देशभरातील घोडे विक्रेते दाखल झाले आहेत. या बाजारात गेल्या काही वर्षांपासून घोड्यांची नावे आणि त्यांच्या किमती हा चर्चेचा विषय ठरला आहे.
गेल्या वर्षी पाच कोटी रुपये किमतीचा ‘रावण’ घोडा विक्रीसाठी आल्याची चर्चा होती. यावर्षी देखील दीड कोटीच्या घोडीची चर्चा आहे. प्रत्यक्षात मात्र गेल्या २० वर्षांत १५ लाखांपेक्षा जास्त किमतीचा घोडा विक्री झाला नसल्याचे बाजार समितीच्या व्यवहारावरून स्पष्ट होते.
दहा वर्षांतील विक्रीचे चित्र
- २०१४ मध्ये सर्वाधिक १५ लाख किमतीचा घोडा ‘महाराष्ट्र केसरी’ राहुल काळभोर (लोणी, जि. पुणे) यांनी खरेदी केल्याची नोंद सापडते. त्यापाठोपाठ २०१३ मध्ये ११ लाख, २०१८ मध्ये पाच लाख ७१ हजार, २०१९ मध्ये पाच लाख ५१ हजारपर्यंत किमतीचा घोडा विक्री झाला आहे.
- २०१२ मध्ये चार लाख ११ हजार, २०१५ मध्ये पाच लाख ११ हजार, २०१६ मध्ये तीन लाख ११ हजार, २०२१ मध्ये तीन लाख ५१ हजार असे सर्वाधिक किमतीचे घोडे विक्री झाले. यावर्षी देखील आतापर्यंत सर्वाधिक किमतीचा ११ लाखांचा घोडा विक्री झाला आहे.