शहाद्यातील मुख्य रस्ते झाले मोकळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 01:52 PM2017-10-14T13:52:46+5:302017-10-14T13:52:53+5:30

पालिकेची कारवाई : मुख्य रस्ते व चौकातील अतिक्रमण हटविले

The main streets of Shahada have become free | शहाद्यातील मुख्य रस्ते झाले मोकळे

शहाद्यातील मुख्य रस्ते झाले मोकळे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शहरातील बसस्थानकालगत, डोंगरगाव रोड, दोंडाईचा रोड, मोहिदा रोडलगत असलेले पक्के अतिक्रमण व वाहतुकीला अडथळा ठरणा:या टप:यांसह इतर अतिक्रमण पालिकेतर्फे काढण्यात आले. शुक्रवारी पक्के व तात्पुरत्या स्वरुपातील 255 अतिक्रमण हटविण्यात आले.
शहरातील मुख्य रस्त्यांवर वाहतुकीला अडथळा ठरणारे अनधिकृत अतिक्रमणधारकांना पालिकेने नोटीसा देऊन तीन   दिवसात अतिक्रमण काढण्याबाबत सूचना केली होती. मात्र अतिक्रमणधारकांनी  दिवाळीर्पयत अतिक्रमण काढू नये, अशी विनंती पालिका व जिल्हा प्रशासनकडे केली होती. मात्र त्यांची प्रशासनाकडून निराशा झाली. अतिक्रमण काढण्याबाबत तीन दिवसांची मुदत गुरुवारी संपल्याने शुक्रवारी सकाळपासून अतिक्रमण हटाव मोहिमेला प्रारंभ झाला.
दिवाळीर्पयत अतिक्रमण काढू नये या मागणीला प्रतिसाद न मिळाल्याने अतिक्रमणधारकांनी दुकानांमधील साहित्य काढण्यासाठी व्यावसायिकांची लगबग सुरू झाली होती. शुक्रवारी सकाळी सात वाजेपासून पानटपरी, सलून, लाँड्री, किराणा दुकान, चहा-नाश्ता, कटलरी  आदी व्यवसायासाठी रस्त्यालगत ठेवलेल्या टप:या काढण्याचे काम   सुरू झाले. जेसीबी मशीनच्या सहाय्याने पक्के अतिक्रमण काढण्यात आले. सायंकाळर्पयत बसस्थानकापासून शासकीय विश्रामगृह, जवाहर स्टोअर्ससमोर ते पटेल रेसीडेन्सीसमोर, महात्मा ज्योतीबा फुले चौक ते महाराणा प्रताप चौक, मोहिदा रस्त्यावरील बेकायदेशीर पक्के अतिक्रमण व टप:या हटविण्यात आले. 
या वेळी प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, उपविभागीय पोलीस अधिकारी एम.बी. पाटील, तहसीलदार मनोज खैरनार, पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, पालिकेचे मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी, पोलीस उपनिरीक्षक सुभाष  जाधव, ज्ञानेश्वर बडगुजर, पालिकेचे अधिकारी व कर्मचारी, पोलीस व राज्य राखीव दलाचे    जवान यांच्या फौजफाटय़ासह अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली.

Web Title: The main streets of Shahada have become free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.