नंदुरबार जिल्हा पोलीस दलात मोठे फेरबदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 01:11 PM2018-08-26T13:11:53+5:302018-08-26T13:12:01+5:30

बदल्यांचे आदेश : 11 निरिक्षक, 13 सहा.निरिक्षक तर 15 उपनिरिक्षकांचा समावेश

Major reshuffle in Nandurbar district police force | नंदुरबार जिल्हा पोलीस दलात मोठे फेरबदल

नंदुरबार जिल्हा पोलीस दलात मोठे फेरबदल

Next

नंदुरबार : जिल्हाअंतर्गत मोठय़ा प्रमाणावर पोलीस अधिका:यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. शनिवारी सकाळी पोलीस अधीक्षक संजय पाटील यांनी हे आदेश काढले. त्यात 11 पोलीस निरिक्षक, 13 सहायक निरिक्षक तर 15 पोलीस उपनिरिक्षकांचा समावेश आहे. बदली झालेल्या अधिका:यांना लागलीच पदभार स्विकारण्यास सांगण्यात आले आहे.
पोलीस निरिक्षक, सहायक पोलीस निरिक्षक आणि उपनिरिक्षकांच्या राज्य व विभागीयस्तरीय बदल्या झाल्यानंतर आता जिल्हाअंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस अधीक्षक संजय पाटील यांनी यासंदर्भातील आदेश शनिवारी काढले.
पोलीस निरिक्षकांच्या बदल्यांमध्ये शहर वाहतूक शाखेचे निरिक्षक गिरीश पाटील यांची नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा विशेष शाखेचे निरिक्षक एस.डी.भोये यांची शहर वाहतूक शाखेत, के.जी.पवार यांची वाहतूक शाखा शहादा उपविभागातून सायबर सेलमध्ये. एस.पी.रणदिवे यांची उपनगर पोलीस ठाण्यातून जिल्हा विशेष शाखेत. डी.के.बुधवंत यांची नियंत्रण कक्षातून उपनगर पोलीस ठाण्यात. 
एन.जी.पवार यांची उपनगर पोलीस ठाण्यातून नियंत्रण कक्ष व पोलीस कल्याण विभाग. संजय महाजन यांची सरदार सरोवर प्रकल्पातून नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात. नितीन चव्हाण यांची शहर पोलीस ठाण्यातून तळोदा पोलीस ठाण्यात. एस.आर.मथुरे यांची शहर पोलीस ठाण्यातून नियंत्रण कक्षात प्रभारी अधिकारी म्हणून. डी.एन.गवळी यांची नियंत्रण कक्षातून सरदार सरोवर प्रकल्पात. एस.एस.शुक्ला यांची शहादा पोलीसात तात्पुरती नियुक्ती होती ती आता कायम करण्यात आली आहे. 
सहायक पोलीस निरिक्षकांमध्ये राकेश चौधरी यांची म्हसावद पोलीस ठाण्यातून पोलीस अधिक्षक कार्यालयात जनसंपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. एस.एन.भंडारे यांची नवापूरहून अक्कलकुवा पोलीस ठाण्यात. एस.टी.बच्छाव यांची उपनगर पोलीस ठाण्यातून आर्थिक गुन्हे शाखा व सायबर सेलमध्ये. एम.डी.पगार यांची सारंगखेडा पोलीस ठाण्यातून म्हसावद पोलीस ठाण्यात. डी.डी.पाटील यांची नवापूरहून बदलीस सहा महिने स्थगिती देण्यात आली आहे. जी.एम.न्हायदे यांची एलसीबीमधून सारंगखेडा पोलीस ठाण्यात. डी.एस.शिंपी यांची वाचक शाखेतून नवापूर पोलीस ठाण्यात. एस.के.जाधव यांची शहादाहून मोलगी पोलीस ठाण्यात. जी.टी.पवार यांची नियंत्रण कक्षातून तालुका पोलीस ठाण्यात. 
के.एस.पगार यांची नियंत्रण कक्षातून अपर पोलीस अधीक्षक यांचे वाचक म्हणून. वाय.एस.कामाले यांची जिल्हा विशेष शाखेतून एलसीबीला. डी.डी.निळे यांची नियंत्रण कक्षातून पोलीस अधीक्षक यांचे वाचक म्हणून. एम.एस.माळी यांची अपर पोलीस अधीक्षक वाचक शाखेतून उपनगर पोलीस ठाण्यात. ए.एम.बेहरानी यांची नियंत्रण कक्षातून शहादा पोलीस ठाण्यात बदली झाली आहे.
पोलीस उपनिरिक्षकांच्या बदल्यांमध्ये एस.एन.पाटील यांची नंदुरबार शहर पोलीस ठाण्यातून नवापूर पोलीस ठाण्यात. वाय.एस.राऊत यांची अक्कलकुवाहून शहादा पोलीस ठाण्यात. डी.जे.बडगुजर यांची शहादा पोलीस ठाण्यातून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात. बी.डी.शिंदे यांची शहादाहून जिल्हा विशेष शाखेत. एस.आर.बि:हाडे यांची नियंत्रण कक्षातून शहर पोलीस ठाण्यात. डी.टी.बि:हाडे यांची विसरवाडी पोलीस ठाण्यातून नंदुरबार उपविभागीय पोलीस अधीक्षक यांचे वाचक म्हणून. डी.एन.चौधरी यांची अपर पोलीस अधीक्षक यांचे वाचक शाखेतून शहर पोलीस ठाण्यात. 
आर.डी.जगताप यांची तालुका पोलीस ठाण्यातून शहर पोलीस ठाण्यात. सी.एम.शिंदे यांची तळोदाहून विसरवाडी पोलीस ठाण्यात. डी.जे.सोनवणे यांची मोलगीतून सारंगखेडा पोलीस ठाण्यात. वाय.एस.पाटील यांची सीसीटीएनएस नंदुरबारहून शहर पोलीस ठाण्यात. अे.सी.मोरे यांची धडगावला. बी.के.कोळी यांची नियंत्रण कक्षातून एलसीबीला तर ए.के.नेरकर यांची शहादा पोलीस ठाण्यातून शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे वाचक म्हणून नियुक्ती करण्यात आले आहे. 
शनिवारी सकाळी अनेक अधिका:यांच्या हातात बदलीच्या ऑर्डरी पडल्या.
 

Web Title: Major reshuffle in Nandurbar district police force

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.