चावी बनविणा:यांकडून प्रकाशा येथे ‘हातसफाई’

By admin | Published: February 10, 2017 12:29 AM2017-02-10T00:29:32+5:302017-02-10T00:29:32+5:30

कपाटाची डुप्लिकेट चावी बनविण्यासाठी असलेल्या दोघा तरुणांनी कपाटाच्या तिजोरीतून रोख रक्कम व सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना येथे घडली.

Making 'Chak': 'Hands Up' at Light | चावी बनविणा:यांकडून प्रकाशा येथे ‘हातसफाई’

चावी बनविणा:यांकडून प्रकाशा येथे ‘हातसफाई’

Next


प्रकाशा : गोदरेज कपाटाची डुप्लिकेट चावी बनविण्यासाठी असलेल्या दोघा तरुणांनी कपाटाच्या तिजोरीतून रोख रक्कम व सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना येथे घडली.
प्रकाशा गावात दोन तरुण डुप्लिकेट चावी बनवून देण्यासाठी फिरत होते. गावातील चौधरी गल्लीतील रहिवासी रमेश साळी यांच्या प}ीने त्या तरुणांना           बोलावून गोदरेज कपाटाची चावी बनविण्याचे सांगितले. त्यांनी चावी गरम करण्याचे संबंधित महिलेला सांगितले. ही महिला घरात चावी  गरम करण्यासाठी गेल्याची संधी साधून या तरुणांनी कपाटाच्या तिजोरीची डुप्लिकेट चावी बनवून त्यातील 25 हजार रुपये रोख व सोन्याच्या दोन अंगठय़ा काढून घेतल्या. त्यानंतर गोदरेज कपाटाची चावी बनवून दिल्यानंतर ते पसार झाले.
सायंकाळी रमेश साळी हे        घरी आल्यानंतर त्यांना कपाटाची चावी बनविल्याचे सांगितले. तेव्हा त्यांनी कपाट उघडून तिजोरी     पाहिली असता त्यातून रोख रक्कम व दागिने लंपास झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत साळी यांनी प्रकाशा पोलीस दूरक्षेत्रात तक्रार दिली आहे.
     (वार्ताहर)

Web Title: Making 'Chak': 'Hands Up' at Light

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.