मालीआंबापाडा ग्रामस्थांची बांबूच्या पुलावरून कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2020 12:54 PM2020-10-08T12:54:19+5:302020-10-08T12:54:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहीर : सातपुड्याच्या दुर्गम भागातील डाबच्या मालीआंबापाडाच्या मधोमध येणाऱ्या नदीवर पुल नसल्याने पाड्यांवरील नागरीकांनी दोन-तीन लाकडाच्या ...

Maliambapada villagers exercise on a bamboo bridge | मालीआंबापाडा ग्रामस्थांची बांबूच्या पुलावरून कसरत

मालीआंबापाडा ग्रामस्थांची बांबूच्या पुलावरून कसरत

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाण्याविहीर : सातपुड्याच्या दुर्गम भागातील डाबच्या मालीआंबापाडाच्या मधोमध येणाऱ्या नदीवर पुल नसल्याने पाड्यांवरील नागरीकांनी दोन-तीन लाकडाच्या फाद्यांवर आठ ते १० बांबुचे टोकर ठेवून जेमतेम तयार केलेल्या पादचारी पुलावर दोघा टोकाला झाडाच्या फाद्यांना बांधलेल्या सुताच्या दोºयाला पकडून चिमुकल्या लहान मुली नदी पार करतात. धोकेदायक उपयोग, सातपुड्याच्या दुुर्गम भागातील डाबच्या मालीआबापाडाच्या मधोमध असलेल्या नदीवर पुुल नसल्याने पाड्यावरील नागरिकांनी धोकेदायक शक्कल लढविली आहे.
सातपुड्याच्या दुर्गम भागातील व अककलकुवा तालुक्यातील डाब ग्रामपंचायती अंतर्गत असलेल्या मालीआंबापाडाच्या मधोमध असलेल्या वरखेडी नदीत, नदीच्या खडतर पाण्यातून दिवसा व रात्री ये-जा करण्यासाठी या पाड्यातील नागरिकांना पुल पुलाअभावी गैरसोय होत असल्याने नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी या नदीच्या पाण्यातून दिवसा व रात्री येण्या-जाण्यासाठी गैरसोय होत असल्याने शक्कल लढवीत नदीच्या दोघा टोकावरील मोठ्या खडकांचा आधार घेत दोघा खडकावर लांब लाकडाच्या दोन-तीन खांब ठेवून त्यावर आठ ते १० बाबुंचे टोकर ठेवत खालून लाकडाच्या बेहट्याचा सपोटने जेमतेम पूल तयार केला आहे. तसेच दोघा काठावरील झाडाच्या फांद्याना सुताचा दोर बांधून सपोट देण्यात आला आहे. या दोराला पकडून तयार केलेल्या लाकडी पुलावरून ये-जा करीत आहे. दरम्यान, चिमुकल्या मुली पाणी आणण्यासाठीदेखील या धोकेदायक पादचारी पुलाचा वापर करीत असल्याने डोक्यावर पाण्याने भरलेली कळशी ठेवून या टोकावरून त्या टोकावर जात आहेत. तसेच केटापाडा, तामणाईमालपाडा, डोणापाणीपाडा, केटापाडा, पिपलोदोपाडा, वेलाआंबापाडा, हावरीबारपाडा, इºयापाडा येथील चिमुकले या मालीआंबापाड्यात असलेल्या अंगणवाडी येत असतात.

Web Title: Maliambapada villagers exercise on a bamboo bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.