नामयज्ञ महोत्सवासाठी कोठलीत भाविकांची मांदियाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2019 12:58 PM2019-12-02T12:58:01+5:302019-12-02T12:58:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुक्यातील कोठली येथे रविवारी भातीजी संप्रदायातर्फे नवकुळ नागपूजा भातिजी नामयज्ञ महोत्सवास मंत्रोच्चाराने सुरुवात करण्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तालुक्यातील कोठली येथे रविवारी भातीजी संप्रदायातर्फे नवकुळ नागपूजा भातिजी नामयज्ञ महोत्सवास मंत्रोच्चाराने सुरुवात करण्यात आली. सायंकाळी निघालेल्या शोभायात्रेने तीन राज्यातील आलेल्या हजारो भाविकांचे लक्ष वेधून घेतले होते. सोमवारी पहाटे कार्यक्रमाचे समापन होणार आहे.
रविवारी दुपारी प.पू. शिवाजी महाराज यांनी गणेश वंदनाने महोत्सवाला सुरुवात केली. त्यानंतर 11 जोडपे यजमानांनी मंत्रोच्चाराचा गजराने यज्ञाची विधिवत पूजाअर्चा केली. सायंकाळी सहा वाजता सामूहिक आरती करण्यात येऊन महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. रात्री साडेआठ ते नऊ वाजेर्पयत भजन व गुरुवंदना कार्यक्रम झाला. विविध ठिकाणाहून आलेल्या संत महात्म्यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी जयसिंग महाराज, जंबूभाई महाराज, सेवादास महाराज, खुमानदास महाराज, कुवरसिंग महाराज, आत्माराम महाराज, नारसिंग महाराज, सोमाभाई महाराज, रुमशीभाई महाराज, शिवाजी महाराज, अनितामाता उपस्थित होते.
दिवसभर भाविकांची मांदियाळी
जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणावर प.पू.भातिजी महाराज यांचा संप्रदाय असून महोत्सवानिमित्ताने कोठली गावात दिवसभर भाविकांची मांदियाळी दिसून आली. संपूर्ण गावात भक्तीमय व धार्मिक वातावरण होते. कार्यक्रमासाठी महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेशातील भाविक उपस्थित होते.
संपूर्ण गावात उभारल्या गुढय़ा
गुढय़ा उभारणे हे विजयाचे व मांगल्याचे प्रतीक असल्याने संपूर्ण गावात घराघरावर भाविकांनी गुढय़ा उभारल्या होत्या. रस्त्याच्या कडेला ठिकठिकाणी युवतींनी आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या.
शोभायात्रेने वेधले लक्ष
आदिवासी नृत्याने महोत्सवाला दुपारी प्रारंभ झाल्यानंतर गावातून संत व महात्म्यांची शोभायात्रा काढण्यात आली. महोत्सव यशस्वी करण्यासाठी एकलव्य गणेश मंडळ, वीर भातिजी मंडळ, सिद्धार्थ नवयुवक मंडळ, स्वाध्याय परिवार, श्रीराम मंडळ, बालाजीवाडा ग्रुप, माऊली माता ग्रुप, युवा प्रतिष्ठान मंडळ तसेच गावातील सर्व महिला बचत गटाच्या महिलांनी परिश्रम घेतले.
कोठली गावात भातिजी संप्रदायाच्या वतीने यज्ञ महोत्सवाच्या वतीने महिनाभरापासून विविध समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या. त्यात गावासह पंचक्रोशीतील अनेक युवक-युवती व महिलांवर जबाबदा:या सोपविण्यात आल्या होत्या. 200 पेक्षा अधिक महिलांनी महोत्सवात शिस्तीचे दर्शन घडवत स्वयंसेविकेचे कर्तव्य बजावले.