मांडवा आश्रमशाळा स्थलांतराला विरोध

By admin | Published: January 4, 2017 11:50 PM2017-01-04T23:50:56+5:302017-01-04T23:50:56+5:30

मोलगी : अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या मांडवा येथील अनुदानित आश्रमशाळेचे स्थलांतर करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे़

Mandva Ashramshala opposes migrations | मांडवा आश्रमशाळा स्थलांतराला विरोध

मांडवा आश्रमशाळा स्थलांतराला विरोध

Next


मोलगी : अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या मांडवा येथील अनुदानित आश्रमशाळेचे स्थलांतर करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे़ या प्रस्तावाला ग्रामस्थांनी ठरावाद्वारे विरोध केला आहे़ या आश्रमशाळेचे स्थलांतर थांबवण्याच्या मागणीचा ठराव करून तो जिल्हाधिकाºयांना देण्यात आला आहे़  
नर्मदा काठावरील गावांमधील विद्यार्थ्यांच्या सोयीची ही आश्रमशाळा याच ठिकाणी राहू द्यावी असा ग्रामस्थांचा आग्रह असला तरी, आदिवासी विकास विभागाने याकडे दुर्लक्ष करून स्थलांतराची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती देण्यात आली आहे़ अति दुर्गम भागात असलेल्या या आश्रमशाळेमुळे या भागात असलेली निरक्षरता दूर होऊन साक्षरतेचे प्रमाण वाढले असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे़ यामुळे ही शाळा याच ठिकाणी ठेवण्यासाठी ग्रामस्थांकडून पाठपुरावा सुरू करण्यात आला आहे़ याठिकाणी नवीन इमारत बांधून विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू ठेवण्याची अपेक्षा ग्रामस्थांनी दिलेल्या ठरावात व्यक्त केली आहे़ (वार्ताहर)

शासनही स्थलांतराबाबत विचार करणार
ग्रामस्थांनी याबाबत केलेले ठरावाच्या प्रती जिल्हाधिकारी डॉ़ एम़ कलशेट्टी, प्रकल्प अधिकारी यांच्याकडे दिल्या आहेत़ या ठरावात म्हटल्याप्रमाणे मांडवा येथेच संबंधित संस्थेला अनुदान देऊन आश्रमशाळेची इमारत उभारण्यात यावी़ या इमारतीसाठी मांडवा ग्रामपंचायतीचे सरपंच भावसिंग फुलसिंग वळवी यांनी जागा देण्याची तयारी दर्शवली आहे़ याबाबत ग्रामपंचायतीने संबंधित संस्थेला वारंवार पत्र देऊनही कारवाई करण्यात आलेली नाही़ मांडवा ग्रामपंचायत हद्दीतील ४०० पालकांनी या ठरावावर स्वाक्षºया केल्याची माहिती देण्यात आली आहे़
अति दुर्गम भागात गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाºया आश्रमशाळेचे स्थलांतर थांबवण्याबाबत ग्रामपंचायतीच्या पदाधिकाºयांकडून लोकप्रतिनिधींसोबत चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती आहे़
याबाबत ‘लोकमत’ने प्रकल्पाधिकारी अभिजीत राऊत यांच्यासोबत संपर्क केला असता, त्यांनी सांगितले की, ग्रामपंचायतीचा या आश्रमशाळेच्या स्थलांतराला विरोध असेल तर, प्रस्तावाचा शासन विचार करेल, शाळा स्थलांतर करण्यासाठी दोन्ही ग्रामपंचायतीची समंती आवश्यक असते़ त्याशिवाय स्थलांतर हे होऊ शकत नाही़ 

१९८८ पासून सुरुवात
आदिवासी विकास विभाग आणि तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय व आदिवासी शिक्षण प्रसारक मंडळ धडगावकडून १९८८ साली या आश्रमशाळेची उभारणी करण्यात आली होती़ नर्मदा नदी काठावर असलेल्या या आश्रमशाळेला पक्की इमारत नसल्याने ही शाळा कुडाच्या घरात चालवली जात होती़ यात पहिली ते १० वीच्या वर्गातील सुमारे एक हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत़ या विद्यार्थ्यांचे स्थलांतर करण्याचा प्रस्ताव देण्यात आल्यानंतर ग्रामस्थांनी तात्काळ विरोध करत स्थलांतराचा प्रस्ताव संबधित संस्थेने मागे घ्यावा यासाठी पदाधिकाºयांसोबत संपर्क केला होता़
अक्कलकुवा शहरपासून काही अंतरावर या आश्रमशाळेचे स्थलांतर करण्यात येणार असल्याची माहिती आहे़ या आश्रमशाळेचे स्थलांतर झाल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे़ नर्मदा काठावर असलेल्या गाव आणि पाड्यांवरील विद्यार्थी या ठिकाणी प्रवेशित आहेत़ पहिली ते १० वीच्या वर्गात साधारण ७०० तर कनिष्ठ महाविद्यालयात ३०० विद्यार्थी शिक्षण घेत असल्याची माहिती आहे़

Web Title: Mandva Ashramshala opposes migrations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.