माणिकराव गावित यांना पत्नीशोक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2016 02:43 AM2016-10-14T02:43:46+5:302016-10-14T02:43:46+5:30
सुरेखाबाई गावित (७५) यांचे अल्पशा आजाराने गुरुवारी नाशिक येथे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या शुक्रवारी नवापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार
Next
नवापूर (नंदुरबार) : सुरेखाबाई गावित (७५) यांचे अल्पशा आजाराने गुरुवारी नाशिक येथे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या शुक्रवारी नवापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री माणिकराव गावीत यांच्या त्या पत्नी होत. गेल्या अनेक दिवसांपासून सुरेखाबाई आजारी होत्या. त्यांच्यावर नाशिक व मुंबई येथे उपचार सुरू होते. माणिकराव गावित यांच्या राजकीय वाटचालीत सुरेखाबाई यांनी समर्थ साथ दिली होती. (वार्ताहर)