एकाच दिवशी तब्बल २०० वराह मेल्याचा फोन, पशुसंवर्धन यंत्रणा झाली खडबडून जागी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:27 AM2021-01-17T04:27:35+5:302021-01-17T04:27:35+5:30
डॉ.यू.डी. पाटील, जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी, जिल्हा परिषद, नंदुरबार वराहांच्या बंदोबस्ताबाबत यंत्रणा घेत नाही ठोस भूमिका शहाराबरोबरच ग्रामीण भागात वराहांचा ...
डॉ.यू.डी. पाटील, जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी, जिल्हा परिषद, नंदुरबार
वराहांच्या बंदोबस्ताबाबत यंत्रणा घेत नाही ठोस भूमिका
शहाराबरोबरच ग्रामीण भागात वराहांचा मोठा वावर आहे. शिवाय या मोसमात वराहांचा अचानक मृत्यू कुठेना कुठे होत आहे. बर्ड फ्लूच्या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. आधीच कोरोनाची भीती आहे. त्यात आता बर्ड फ्लूची भर पडली आहे, असे असताना वराहांच्या वाढत्या उपद्रवाबाबत ग्रामपंचायती व नगर पालिका प्रशासनाने ठोस अशी भूमिका घेतली नसल्याचा आरोप आहे. त्यांच्या अशा भूमिकेमुळे वराह पालकांचे फावत आहे. केवळ तेवढ्यापुरता दिखावा करीत पुन्हा ‘जैसे थे’ चित्र होते. वास्तविक या साथींच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ महसूल प्रशासन व पशुवैद्यकीय प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत; परंतु त्यांच्या पत्राला केराची टोपली दाखविण्यात आली आहे. कारण आजही शहराबरोबरच ग्रामीण भागातही वराहांची संख्या मोठी आहे. वराह मालकही आपल्या वराहांना लसीकरण करण्यास पशुआरोग्य यंत्रणेला सहकार्य करायला तयार नाहीत. दरम्यान, बोरद गावातील संपूर्ण वराहांचे लसीकरण करण्यात आले असल्याचे सूत्रांनी सांगितले. शिवाय शासनाच्या सर्वच यंत्रणांना खबरदारी घेण्याची सूचना देण्यात आली आहे.