मुले पळविणा:यांच्या संशयावरून घोटाणे, ब्राम्हणपुरी, म्हसावद, शहाद्यात अनेकांना बदडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 01:02 PM2018-06-30T13:02:38+5:302018-06-30T13:02:52+5:30

Many children have changed in the scandal, Brahmanpuri, Mhasawad, Shaadi | मुले पळविणा:यांच्या संशयावरून घोटाणे, ब्राम्हणपुरी, म्हसावद, शहाद्यात अनेकांना बदडले

मुले पळविणा:यांच्या संशयावरून घोटाणे, ब्राम्हणपुरी, म्हसावद, शहाद्यात अनेकांना बदडले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : म्हसावद, ता़ शहादा येथे तिघांना बेदम मारहाण करून गाडी जाळल्याची घटना ताजी असतानाच शुक्रवारी सकाळी घोटाणे, ता़ नंदुरबार येथे भिक्षुकी करणा:या पाच जणांना बालिका पळवल्याच्या संशयातून मारहाण झाली़ दरम्यान, बालिका घरातच आढळून आल्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला़ 
जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून मुले पळवणा:या टोळ्या आल्याच्या अफवांचे पीक आले आह़े यातून सातत्याने अनोळखी व्यक्तींना पकडून मारहाण करण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत़ गुरुवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास म्हसावद, ता़ शहादा येथे पंढरपूर येथून मजुरांच्या चौकशीसाठी आलेल्या तिघांना बेदम मारहाण करण्यात येऊन त्यांचे वाहन जाळण्यात आले होत़े याप्रकरणी शुक्रवारी पहाटे म्हसावद पोलीस ठाण्यात 250 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े मारहाणीत जखमी झालेल्या तिघांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आह़े याचदरम्यान नळवे, ता़नंदुरबार शिवारातही रात्री उशिरा मुले पळवणारी टोळी आल्याची अफवा पसरल्याने एकच धावपळ सुरू होती़ तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने येथे पोहोचून अफवा असल्याचे सांगितल्यावर नागरिकांचे समाधान झाले होत़े तसेच तळोदा शहरातही मुले पळवणारी टोळी आल्याच्या अफवांमुळे नागरिक चिंता व्यक्त करत होत़े 
ब्राrाणपुरी येथे बहुरूपीस पळवले  
 शहादा तालुक्यातील ब्राrाणपुरी येथे दोन दिवसांपासून फिरून लोकांचे मनोरंजन करून भिक्षुकी करणारा बहुरूपीही संशयाचा बळी ठरला़ म्हसावद येथील घटनेनंतर ब्राrाणपुरी गावातही मुले पळवणारी टोळी आल्याची अफवा पसरली़ यातून काहींनी गाव परिसरात दोन दिवसांपासून फिरणा:या बहुरूपीचा भागापूर, सुलतानपूर या गावांमध्ये जाऊन शोध घेतला़ या वेळी जवखेडा येथे तो दिसून आल्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली़ परंतु पोटासाठी आपण सोंग घेऊन भिक्षुकी करत असल्याचे त्याने सांगिल्यावर प्रकरणावर पडदा पडला़ ब्राrाणपुरी गावात दीड महिन्यापूर्वी डॉ.भरत पाटील यांचे घर भरदिवसा फोडून चोरटय़ांनी 40 तोळे सोने लंपास केले होत़े सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन महिला दिसून आल्यानंतर बहुरूपीवर संशय वाढल्याचे ग्रामस्थांनी सांगितल़े
घोटाणे येथे सकाळी 9 वाजेच्या सुमारास सुरेश भगवान शिंदे, परमेश्वर बाबूराव चव्हाण, डिगंबर सिद्धू शेगर, तिघे रा़ओझर, ता़ जामनेर, जि़ जळगाव, गोरख शंकर चव्हाण, रा़ पहूर, ता़ जामनेर, ज्ञानेश्वर विश्वनाथ चव्हाण, रा़ शेलुद, ता़ भोकरदन, जि़ जालना हे पाचही जण साधूच्या वेशात फिरून भिक्षा मागत असतानाच गावातून पाच वर्षीय बालिका बेपत्ता झाल्याची अफवा पसरली़ तिच्या कुटुंबीयांसह ग्रामस्थांनी या चौघांना ताब्यात घेत त्यांची चौकशी सुरू केली़ अचानक झालेल्या गर्दीमुळे भांबावलेल्या चौघांनी स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न केला असता दोघांना मारहाणही झाली़ या प्रकारानंतर ग्रामस्थांनी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात फोन करून माहिती दिल्यावर पोलीस निरीक्षक संजय महाजन यांनी भेट देऊन पाचही जणांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणल़े याचदरम्यान बेपत्ता झालेली बालिका घरातील शौचालयात कोंडलेल्या अवस्थेत आढळून आल्याची माहिती मिळाली़ 
गावात पाच साधू आल्याची भीती कोणीतरी घातल्याने बालिका थेट शौचालयात लपली होती़ आत बालिका गेल्याचे कोणाच्या लक्षात न आल्याने बाहेरून शौचालयाला कडी लावली गेली़ बालिका दिसून न आल्याने तिचे कुटुंबीय तिचा शोध घेऊ लागल़े यात पाचही जण गावात भिक्षा मागत हिंडत असल्याने त्यांची चौकशी करण्यास सुरुवात झाली़ बालिका पळवल्याची अफवा पसरल्याने भिक्षुकी करणा:यांना मार पडून पोलीस ठाण्यात आणण्यात आल़े नंदुरबार शहरातील भोणे फाटा परिसरात राहणा:या या पाचही जणांच्या कुटुंबीयांना तालुका पोलीस ठाण्यात पाचारण करून पोलीस निरीक्षक संजय महाजन यांनी त्यांच्या गावांच्या पोलीस ठाण्यांना संपर्क केल्यानंतर त्यांचा पारंपरिक व्यवसाय हा भिक्षुकी करण्याचा असल्याची माहिती मिळाल्यानंतर सोडून देण्यात आल़े
घटनेतील बालिकेस तत्काळ रनाळे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होत़े या ठिकाणी तिची प्रकृती ठीक असल्याची माहिती देण्यात आली़ 
म्हसावद, ता़शहादा येथे नंदकुमार बाळोबा डोंबे, सचिन गुरलिंग तवटे,  रामा विठ्ठल शिंदे, तिघे रा़ पंढरपूर या तिघांना मुले पळवणारे समजून मारहाण झाली होती़ म्हसावद गावातील अनकवाडा भागातील स्मशानभूमी रोडवर हा प्रकार घडला होता़ या मारहाणीनंतर तिघांना पोलीस ठाण्यात आणल्यानंतर संतप्त जमावाने त्यांचे चारचाकी वाहन पोलीस ठाणे आवारात जाळून टाकले होत़े या वेळी जमावाला पांगवण्यासाठी आलेल्या एसआरपीएफ जवान आणि पोलीस कर्मचा:यांवरही दगडफेक करण्यात आली़ या दगडफेकीत पोलीस नाईक शंकर उत्तम मालचे व पोलीस शिपाई समाधान साबळे हे दोघेही जखमी झाल़े दगडफेकीत उपविभागीय पोलीस अधिकारी एम़बी़पाटील यांच्या वाहनांवर दगडफेक झाल्याने वाहनाचे नुकसान झाल़े रात्री उशिरा पोलिसांनी जमावावर नियंत्रण मिळवले होत़े सहायक पोलीस उपनिरीक्षक कृष्णा तुळशीराम दाभाडे यांच्या फिर्यादीवरून शुक्रवारी पहाटे म्हसावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला़ तब्बल 250 लोकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सहायक पोलीस निरीक्षक राकेश चौधरी करीत आहेत़
म्हसावद येथे मारहाणप्रकरणी अशोक रतिलाल शेमळे, शिंगजी तिरू ठाकरे, काजू भरम शेमळे, रवी भिल, छोटय़ा टिल्या, फत्तेपु:या, दिलवर रतन पाडवी, गणेश भयसिंग भिल, प्रेमराज मगर शेमळे, विशाल दिलवर ठाकरे, राहुल नामदेव वाघ, सागर भटू तेले, विष्णू गण्या ठाकरे, युवराज सुका ठाकरे, जयदेव कैलास सुकळे, शिवाजी राजू शेमळे, कृष्णा बन्या ठाकरे, भीमा अशोक ठाकरे, विजय संजय ठाकरे, दामा मोहन ठाकरे, ईश्वर ब्रिजलाल मालचे, करण बन्सी ठाकरे, किसन अशोक ठाकरे, अंबालाल सुभाष मुसळदे, राकेश अप्पा मुसळदे, गोपाल बिरम उखळदे, हिम्मत सुभाष ठाकरे, प्रेमचंद राजू ठाकरे, लखन सुखदेव ठाकरे, किरण दंगल ठाकरे, नीलेश मनोहर मोरे, विकास प्रकाश पवार, विजय भीमसिंग पवार, राजेंद्र किसन पवार, प्रवीण किशोर पवार यांच्यासह 250 जणांवर गुन्हे आहेत़ घटनेनंतर म्हसावद गावात तणावपूर्ण शांतता आह़े 

Web Title: Many children have changed in the scandal, Brahmanpuri, Mhasawad, Shaadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.