वैयक्तिक शौचालय योजनेपासून अनेक वंचित
By admin | Published: January 11, 2017 12:13 AM2017-01-11T00:13:14+5:302017-01-11T00:13:14+5:30
निर्मल भारत अभियान : नव्याने सव्रेक्षणाची मंदाणे ग्रामस्थांची मागणी
मंदाणे : शहादा तालुक्यातील पूर्व भागातील मंदाणे येथे निर्मल भारत अभियानांतर्गत असलेल्या योजनेपासून अनेक पात्र लाभार्थी वंचित राहिल्याने नव्याने सव्रेक्षण करण्याची मागणी होत आहे.
निर्मल भारत अभियानांतर्गत मंदाणे गावात एका संस्थेमार्फत 2011-12 मध्ये सव्रेक्षण करण्यात आले होते. त्यात गावातील काही लोकांना माहिती होती तर काही जण अनभिज्ञ होते. या अभियानांतर्गत झालेल्या सव्रेक्षणात ‘येस’ किंवा ‘नो’ अशी मांडणी करण्यात आली होती. त्यामुळे ज्यांच्याकडे वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम नसताना शौचालय बांधकाम झाल्याचे दिसत असल्याने त्यांना शासनाकडून मिळणा:या 12 हजार रुपये अनुदानाचा लाभ मिळत नाही. या प्रकारामुळे कोणीही व्यक्ती शौचालय बांधण्याविषयी सक्रीत दिसत नाहीत. तसेच काही जणांनी मागील दोन वर्षात नवीन शौचालय बांधले आहेत त्यांनाही या योजनेचा लाभ मिळत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. गावातील काही लाभार्थीची नावेही यादीतून गायब झाली आहेत. यादीत नाव नसल्याने ग्रामपंचायत कार्यालययात वाद होतात. म्हणून या अभियानांतर्गत नव्याने सव्रेक्षण करण्याची मागणी होत आहे.
(वार्ताहर)
ज्यांच्याकडे शौचालय बांधकाम केले नसताना यादीत ‘येस’ आले आहे व ज्यांनी मागील दोन-तीन वर्षात शौचालय बांधकाम केले आहे परंतु त्यांना अनुदानाचा लाभ मिळाला नाही ते सर्व लाभार्थी यादीत 186 कुटुंबांचा समावेश आहे. ती यादी गटविकास अधिका:यांकडे पाठवली आहे. परंतु मागील एक वर्षापासून त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
-विजय पाटील, ग्रामविकास अधिकारी, ग्रा.पं. मंदाणे
यादीत ज्यांच्या नावापुढे ‘नो’ असेल त्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल. यामुळे गावातील अनेक गरजू लाभार्थी वंचित राहिले आहेत.
-विजय सनेर, सरपंच, मंदाणे