मुदत ठेवीच्या नावावर अनेकांना लाखोंचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2019 12:06 PM2019-12-07T12:06:56+5:302019-12-07T12:07:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मुदत ठेवीच्या नावावर पैसे गोळा करून फसणूक केल्याप्रकरणी धुळे, सुरत व नंदुरबार येथील तिघांविरुद्ध ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : मुदत ठेवीच्या नावावर पैसे गोळा करून फसणूक केल्याप्रकरणी धुळे, सुरत व नंदुरबार येथील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणुकीची रक्कम दीड ते दोन लाखापेक्षा अधीक असल्याचे समजते. एजंट महिलेनेच फिर्यादी दिली आहे.
लाईफ लाँग आयडेल कंपनी इंडिया लिमिटेड असे फसवणूक करणाऱ्या कंपनीचे नाव आहे. ज्ञानेश्वर शिवदास पाटील, संचालक, रा.बल्हाणे, ता.धुळे, संतोष किसन सपकाळे, रा.सुरत व प्रफुल्ल सुरेश दुसाणे रा.नंदुरबार असे संशयीतांचे नावे आहेत. कंपनीने टेंभा व परिसरातील गावांसाठी अक्काबाई धारू कोळी यांची एजंट म्हणून नेमणूक केली होती. त्यांनी अनेकांची विमा आणि ठेवींची रक्कम घेवून सभासद केले होते. ही रक्कम जवळपास दीड ते दोन लाख रुपये असल्याचे बोले जात आहे.
ठेवी व विम्याची मुदत संपत आल्याने कोळी यांनी कंपनीकडे पैशांची मागणी केली असता त्यांनी टाळाटाळ केली. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर अक्काबाई कोळी यांनी सारंगखेडा पोलिसात फिर्याद दिली. त्यावरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक सोनवणे करीत आहे. यामुळे खळबळ उडाली असून पैसे परत मिळण्यासाठी ठेवीदार चकरा मारत आहेत.