राजधानी एक्सप्रेससह अनेक गाडय़ा नंदुरबारमार्गे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 12:19 PM2019-08-06T12:19:33+5:302019-08-06T12:19:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मुंबईला सुरू असलेल्या पावसामुळे उत्तर भारतात जाणा:या अनेक रेल्वेगाडय़ा नंदुरबारमार्गे वळविण्यात आल्या आहेत. त्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : मुंबईला सुरू असलेल्या पावसामुळे उत्तर भारतात जाणा:या अनेक रेल्वेगाडय़ा नंदुरबारमार्गे वळविण्यात आल्या आहेत. त्यात राजधानी एक्सप्रेसचा देखील समावेश आहे. यामुळे रेल्वे स्थानकात दिवसभर मोठी गर्दी होती.
मुंबई येथे गेल्या आठ दिवसांपासून पावसाची संततधार आहे. त्यामुळे अनेक रेल्वे गाडय़ांचा खोळंबा झाला आहे. ही बाब लक्षात घेता मुंबईहून सुटणा:या काही जलद रेल्वेगाडय़ा नंदुरबारमार्गे वळविण्यात आल्या आहेत. सोमवारी पहाटेपासून या गाडय़ा या मार्गाने धावू लागल्या आहेत. मुंबईहून बलसाड, बेस्तान नंदुरबार, भुसावळमार्गे या गाडय़ा पुढे धावत आहेत.
या मार्गाने वळविण्यात आलेल्या आहेत. त्यात बांद्रा-अमृतसर, बांद्रा-दिल्ली, मुंबई सेंट्रल- नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेस, मुंबई सेंट्रल-निजामुद्दीन एक्सप्रेस, बांद्रा- निजामुद्दीन एक्सप्रेस, बांद्रा-गोरखपूर एक्सप्रेस, मुंबई सेंट्रल-अमृतसर एक्सप्रेस, बांद्रा-देहराडून, बांद्रा गाझीपूर एक्सप्रेस या गाडय़ांचा समावेश आहे.
पहाटेपासून या गाडय़ा नंदुरबार स्थानकात येत होत्या. त्यामुळे स्थानकात मोठी गर्दी झाली होती. शिवाय नियमित काही गाडय़ांना साईडला ठेवावे लागत होते. राजधानी एक्सप्रेस काही काळ नंदुरबार स्थानकात थांबली होती. त्यामुळे ही एक्सप्रेस पहाण्यासाठी काहींनी रेल्वेस्थानकात हजेरी लावली होती.
दरम्यान, नवजीवन एक्सप्रेस सुरुवातीला चार तास उशीरा सांगण्यात आली. नंतर ती रद्द केल्याचे जाहीर करण्यात आल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला.