कदमबांडे विद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:27 AM2021-01-17T04:27:26+5:302021-01-17T04:27:26+5:30
१४ ते २८ जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या पंधरवड्यात निबंध, हस्ताक्षर, शुद्धलेखन, वक्तृत्व, घोषवाक्य, ग्रंथ प्रदर्शन, कविता वाचन, प्रश्नमंजूषा व श्यामची ...
१४ ते २८ जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या पंधरवड्यात निबंध, हस्ताक्षर, शुद्धलेखन, वक्तृत्व, घोषवाक्य, ग्रंथ प्रदर्शन, कविता वाचन, प्रश्नमंजूषा व श्यामची आई या पुस्तकातील रोज एक विद्यार्थी-विद्यार्थिनींचे कथा वाचन, आदी कार्यक्रमांचे आयोजन शाळेत करण्यात आले आहे. यावेळी मराठी भाषा प्रमुख एम. बी. पाटील यांनी मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी नेहमी मराठीतच संभाषण, संवाद साधला पाहिजे व विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे सांगितले. विद्यालयाचे प्राचार्य पी. टी. पाटील यांनी मराठी भाषेचे महत्त्व पटवून दिले. यावेळी पर्यवेक्षक एन. बी. पाटील, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविक एस. ए. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन आर. पी. केसकर यांनी केले. आभार एन. एन. बावा यांनी मानले.