3 मार्चला नंदुरबारात अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 01:04 PM2018-02-26T13:04:32+5:302018-02-26T13:04:32+5:30
लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 26 : शालार्थ वेतन प्रणाली बंद असल्याने जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षक व 20 टक्के अनुदानित शाळांमधील शिक्षक चार महिन्यांपासून वेतनाविना असल्याने त्यांच्यापुढे आर्थिक समस्या निर्माण झाली आह़े वेतन नियमित होण्यासाठी 3 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
राज्यात खाजगी व्यवस्थापनाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील कर्मचा:यांचे वेतन शालार्थ प्रणालीद्वारे काढले जात़े परंतू शालार्थ प्रणाली बंद असल्याने शासनाने ज्यांचे ऑनलाईन वेतन डिसेंबर अखेर झाले असेल त्यांना वेतन देण्याचे आदेश दिले आहेत़ इतरांना ऑफलाईन पद्धतीने वेतन देण्याचे आदेश काढले आहेत़ नंदुरबार जिल्ह्यात 20 टक्के अनुदानित शाळांचे शासनाकडून अनुदान उपलब्ध नसल्याने त्यांचे हाल होत आहेत़ यामुळे माध्यमिक शिक्षकांचे विमा हप्ते, गृह कर्ज हप्ते, पर्सनल लोन, इन्कन टॅक्स आदी कामांना खीळ बसली आह़े शासनाकडून शिक्षकांच्या ऑनलाईन कर्मचा:यांचे ऑफलाईन वेतन अदा करून मार्ग काढण्याची मागणी असून कारवाई न झाल्यास 3 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी दोन ते पाच या वेळेत शिक्षकांकडून धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे नंदुरबार जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर नांद्रे, सचिव एस़एऩपाटील, कार्याध्यक्ष ए़बी़ पाटील, मुख्याध्यापक संघाचे मुकेश पाटील, सचिव सुनिल भामरे, कुंदन पाटील यांनी कळवले आह़े