कांदा व टमाटा आवक घटीमुळे बाजारात अवकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 12:54 PM2018-07-19T12:54:42+5:302018-07-19T12:54:48+5:30
किरकोळ बाजार महागला : नंदुरबार तालुक्यातील कांदा परराज्यात रवाना
नंदुरबार : कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा आणि टमाटा आवक घटल्याने बाजारावर अवकळा पसरली असून सामान्य ग्राहकांना महागाईचा सामना करावा लागत आह़े दर दिवशी कांद्याची 20 तर टमाटा आवक 10 क्विंटलपेक्षा अधिक होत नसल्याने व्यवहारही रोडावले आहेत़
नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागातील गावांसह साक्री आणि पिंपळनेर परिसरातील शेतकरी नंदुरबार बाजारात दुपारी भाजीपाला आणि कांदा विक्रीसाठी आणतात़ शेतक:यांच्या खरीप कांदा उत्पादनाला यंदा जिल्ह्याच्या बाजारात भाव मिळत नसल्याने त्यांच्याकडून साठा करून ठेवण्यावर भर देण्यात आला होता़ यातून गेल्या तीन महिन्यांपासून कांदा आवक ही 500 क्विंटलपेक्षा अधिक झालेली नसल्याची माहिती बाजार समितीकडून देण्यात आली आह़े साठवलेला कांदा आज ना उद्या शेतकरी बाजारात आणणार अशी शक्यता असल्याने बाजारातील कांदा व्यापारी आणि आडतदार निर्धास्त होत़े परंतू गेल्या दोन आठवडय़ांपासून देशातील महत्त्वपूर्ण कांदा बाजार असलेल्या अहमदाबाद आणि इंदौर या दोन्ही ठिकाणी प्रतीक्विंटल 1850 ते 2100 रूपये दर कांद्याला देण्यात येत असल्याने शेतक:यांनी तिकडे धाव घेतली आह़े यातून नंदुरबार बाजार समितीत गत दोन आठवडय़ांपासून कांदा आवक नावालाच असल्याचे चित्र आह़े
एकीकडे कांद्याबाबत ही स्थिती असताना दुसरीकडे टमाटा उत्पादनाचे आकडेही यंदा कमी झाले आहेत़ लांबलेल्या पावसामुळे टमाटा उत्पादन येण्यास विलंब होत असल्याने शेतकरी मेटाकुटीस आले होत़े कूपनलिकांची पातळी खोल गेल्याने बहुतांश शेतक:यांना टमाटा बागा फुलवता आल्या नव्हत्या़ यातून टमाटा उत्पादन कमालीचे घटल्याने ही स्थिती निर्माण झाली आह़े येत्या काळात पाऊस वाढल्यानंतरच बाजारात टमाटा आवक वाढणार असल्याची माहिती देण्यात आली आह़े
किरकोळ बाजारात कांदा 15 ते 20 रूपये किलो दराने विक्री होत आह़े सडका कांदाही विक्री होत असल्याचे चित्र बाजारात आह़े