बाजारात लाल मिरचीची ढेसर

By admin | Published: January 11, 2017 11:21 PM2017-01-11T23:21:22+5:302017-01-11T23:21:22+5:30

मिरची बाजारात सध्या लाल मिरचीची ढेसर सुरू असून भावदेखील घसरत आहेत.

In the market, red chilli litter | बाजारात लाल मिरचीची ढेसर

बाजारात लाल मिरचीची ढेसर

Next

नंदुरबार : मिरची बाजारात सध्या लाल मिरचीची ढेसर सुरू असून भावदेखील घसरत आहेत. दररोज तब्बल पाच हजार क्विंटल आवक सुरू आहे. जवळपास चारशे वाहने दाखल होत असल्यामुळे बाजार समितीत वाहने लावण्यासाठीदेखील जागा उपलब्ध राहत नसल्याची स्थिती आहे. येत्या काही दिवसार्पयत ही स्थिती कायम राहणार असल्याचे चित्र आहे.
गेल्या अनेक वर्षानंतर येथील मिरची बाजाराला ठसका आवकचा ठसका आला आहे. गेल्या पाच ते सहा वर्षापासून जिल्ह्यात मिरचीची लागवड कमी झाली होती. परिणामी आवक देखील कमी होती. साधारणत: सव्वा ते दीड लाख क्विंटलर्पयत आवक स्थिर राहत होती. त्यामुळे मिरची बाजाराला अवकळा आली होती. ही स्थिती लक्षात घेता येथील मिरची बाजाराची ओळख पुसली जाते किंवा कशी याबाबत साशंकता व्यक्त होत होती. परंतु यंदा मिरची बाजाराला ब:यापैकी तारल्याचे चित्र दिसून येत आहे.
यंदा लागवड वाढली
यंदा मिरचीची लागवड गेल्या पाच ते सहा वर्षाच्या तुलनेत दुप्पटीने वाढली आहे. शिवाय रोगांचा प्रादुर्भावदेखील यंदा कमीच राहिला. त्यामुळे मिरचीचे उत्पादन यंदा दुप्पटीने आले आहे. त्याचा परिणाम मिरची आवकवर होऊ लागला आहे.
बाजार समितीत कधी नव्हे ती यंदा हिरवी मिरचीदेखील मोठय़ा प्रमाणावर दाखल झाली होती. हिरव्या मिरचीच्या पथारीदेखील यंदा बाजार समितीत पहावयास मिळाल्या होत्या. अवघे पाच ते सात रुपये किलो अर्थात पाचशे ते सातशे रुपये क्विंटल दराने बाजारात हिरवी मिरची विकावी लागली होती.
आवक दुप्पट
सध्या लाल मिरचीची आवक दुप्पट झाली आहे. साधारणत: दोन ते अडीच हजार क्विंटल लाल मिरचीची आवक होत असते.
यंदा हंगामाच्या सुरुवातपासूनच दोन हजार क्विंटल आवक सुरू    झाली होती. आता तर साडेचार ते   पाच हजार क्विंटल आवक सध्या    सुरू आहे. त्यामुळे लाल मिरचीची अक्षरश: ढेसर बाजार समितीत लागली आहे.
दररोज किमान चारशे वाहने भरून मिरची बाजार समितीत दाखल होत आहे. त्यामुळे या भागात मोठय़ा प्रमाणावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. मिरची टाकण्यासाठी जागा राहत नसल्याचेही चित्र दिसून येत आहे. त्याचा परिणाम शेतकरी मिळेल त्या भावात मिरची विकून मोकळा होत आहे.
भाव घसरू लागले
सध्या दुस:या तोडची मिरची बाजारात दाखल होत आहे. शिवाय फाफडा मिरचीही मोठय़ा प्रमाणावर येऊ लागली आहे. त्यामुळे भाव कधी स्थिर तर कधी घसरत आहेत. सध्या 1400 रुपये क्विंटलपासून भाव सुरू आहेत.
मिरचीच्या जातीनुसार व प्रतवारीनुसार भाव दिला जात आहे. जास्तीत जास्त 2600 रुपये क्विंटलर्पयत भाव मिळत आहे. येत्या काळात मिरचीची आवक कमी    होईल त्याप्रमाणात पुन्हा भाव उचल खातील अशी शक्यता वर्तविली जात आहे. शेतक:यांनाही आशा लागून आहे.

 

यंदा बॅकलॉग भरून निघणार..
बाजार समितीत यंदाच्या हंगामात सव्वा लाख क्विंटलर्पयत मिरची आवक झाली आहे. आणखी किमान इतकीच आवक येत्या काळात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षातील बॅकलॉग भरून निघणार असल्याचे स्पष्ट आहे. सध्या दररोज साडेतीनशे ते चारशे विविध लहान मोठी वाहने भरून मिरची येथे दाखल होत आहे. किमान पाच हजार क्विंटल आवक कायम आहे. ओल्या मिरचीसह कोरडय़ा मिरचीला देखील मोठी मागणी असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव योगेश अमृतकर यांनी दिली.

Web Title: In the market, red chilli litter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.