20 लाखासाठी विवाहितेचा छळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 12:15 PM2019-07-13T12:15:14+5:302019-07-13T12:15:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : माहेरुन 20 लाख रुपये आणावेत यासाठी नंदुरबारचे माहेर असलेल्या विवाहितेचा पुण्यातील सासरी छळ करण्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : माहेरुन 20 लाख रुपये आणावेत यासाठी नंदुरबारचे माहेर असलेल्या विवाहितेचा पुण्यातील सासरी छळ करण्यात आला़ डिसेंबर 2015 ते जानेवारी 2019 र्पयत हा प्रकार सुरु होता़
नळवा रोडवरील खंडेराव पार्क येथील माहेर असलेल्या पूजा हर्षद साकरीया यांचा विवाह हर्षद रामलाल साकरीया रा़ भाग्योदय बिल्डींग, विठ्ठलवाडी, पुणे याच्यासोबत झाला होता़ विवाहानंतर पती हर्षद याच्यासह त्याच्या कुटूंबियांनी पूजा यांना त्रास देण्यास सुरुवात केली होती़ लगAाच्या वेळी माहेरुन कोणतीही मोठी भेटवस्तू आणली नाही, तसेच पती हर्षद यास अल्युमिनिअमचा सेक्शनचा कारखाना काढावयाचा असल्याने पूजा यांनी वडिलांकडून 20 लाख रुपये आणावेत यासाठी वेळोवेळी छळ सुरु केला होता़ दरम्यान विवाहिता माहेरी आली असता, पती हर्षद याच्यासह कुटूंबातील 9 जणांनी येथे येऊन 20 लाख रुपये दिल्यावर नांदवण्यास घेऊन जाऊ अशी धमकी विवाहितेच्या आई-वडीलांना दिली होती़
याप्रकरणी पूजा हर्षद साकरीया यांनी बुधवारी उपनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन पती हर्षद, सासू ललिता रामलाल साकरीया, सुंदरबाई मूलाजी साकरीया, नणंद कोमल रामलाल साकरीया, हेमंत दिलीप दरलेशा, अक्षता हेमंत दरलेशा, सुनिता चुनीलाल दरलेशा, चुनीलाल शिवलाल दरलेशा, राजेंद्रकुमार शिवलाल दरलेशा, संगिता राजेंद्रकुमार दरलेशा सर्व रा़ पुणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक संगीता बविस्कर करत आहेत़