शहाद्यातील जनजीवन विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 12:25 PM2019-08-10T12:25:32+5:302019-08-10T12:25:39+5:30
नंदुरबार आगाराच्या 320 फे:या रद्द नंदुरबार : संततधार पावसामुळे गत दोन दिवसांपासून एसटीला सक्तीची विश्रांती मिळाली आह़े नंदुरबार बसस्थानकातून ...
नंदुरबार आगाराच्या 320 फे:या रद्द
नंदुरबार : संततधार पावसामुळे गत दोन दिवसांपासून एसटीला सक्तीची विश्रांती मिळाली आह़े नंदुरबार बसस्थानकातून सुटणा:या बसेसच्या 320 फे:या गुरुवार आणि शुक्रवारी रद्द करण्यात आल्या़ नंदुरबार येथून केवळ धुळे मार्गावर दोन दिवसांपासून बसेस सुरु आहेत़
जिल्ह्यात बुधवारी रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली होती़ गुरुवारी सकाळपासून ठिकठिकाणी पाणी साचून रस्ते बाधित झाले होत़े नंदुरबार ते शहादा, तळोदा, अक्कलकुवा, नवापुर मार्गावर वाहतूक बंद झाली होती़ गुरुवारी दुपारनंतर बसेस सुटू शकल्या नाहीत़ यातून गुरुवार दुपार ते शुक्रवारी दिवसभरात 320 फे:या रद्द करण्यात आल्याची माहिती आह़े गुरुवारी लांब पल्ल्याच्या मार्गावर होणा:या 100 फे:या रद्द झाल्या होत्या़ यातून 9 हजार 730 किलोमीटर प्रवास रद्द झाला़ ग्रामीण मार्गावर गत दोन दिवसात 220 फे:या रद्द करण्यात आल्या आहेत़ यातून 4 हजार किलोमीटर प्रवास रद्द झाल्याची माहिती देण्यात आली आह़े
नंदुरबार आगारातून सुटलेल्या सर्व बसेस गुरुवारीच बोलावण्यात आल्या होत्या़ यातील केवळ दोन बसेस माघारी राहिल्या होत्या़ यातील नंदुरबार आगाराची पंढरपूर बस ही टेंभूर्णी जि़ अहमदनगर येथे थांबवण्यात आली आह़े तर खापर ते नंदुरबार ही बस शुक्रवारी सकाळीच परत आली होती़ गुजरात राज्यात जाणा:या बसेस दोन दिवसांपासून आगारात थांबून असल्याची माहिती आगारप्रमुख मनोज पवार यांनी दिली आह़े
नंदुरबार आगारातील 100 बसेस थांबून आहेत़ आगारातील 220 चालक आणि 230 वाहक सतर्कता म्हणून आगार मुख्यालयी थांबवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आह़े
दरम्यान शुक्रवारी सायंकाळी नंदुरबार ते नाशिक ही बस सोडण्यात आल्याची माहिती देण्यात आली आह़े पाऊस पूर्णपणे ओसरल्यानंतर बसेस सोडण्यात येणार आहेत़ दोन दिवस बंद असलेल्या बसेसमुळे तातडीने प्रवास करुन इच्छिणा:या तसेच दैनंदिन प्रवास करणा:यांचे हाल झाल़े खाजगी प्रवासी वाहनातून धोकेदायकरित्या प्रवासी वाहतूक सुरु असल्याचे दिसून आल़े
शहादा बसस्थानक ठप्प
शहादा बसस्थानकातून दरदिवशी लांब, मध्यम आणि ग्रामीण मार्गावर 632 फे:या करण्यात येतात़ गत दोन दिवसांपासून या फे:याच होऊ शकलेल्या नसल्याची माहिती देण्यात आली़ दोंडाईचा रोडवरील भेंडवा नाल्याचे पाणी ओसरत नसल्याने धुळ्याकडे जाणा:या बसफे:या रद्द करण्यात आल्या़ नंदुरबार, तळोदा, प्रकाशा, धडगाव, अक्कलकुवा तसेच लांब पल्ल्याच्या बसेस थांबवण्यात आल्या होत्या़ शुक्रवारी सायंकाळी 12 फे:या पूर्ण करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आह़े ग्रामीण भागातील बसेस सायंकाळी सोडण्यात आल्या होत्या़
तळोदा आगारात भोजनाची सोय
वरखेडी नदीच्या पुरामुळे गुजरात राज्याकडे जाणा:या बसेस तळोदा बसस्थानकात थांबवण्यात आल्या होत्या़ याठिकाणी जळगाव, औरंगाबाद, शिरपूर, अहमदाबाद, बडोदा, सुरत, अक्कलकुवा व धुळे आगाराच्या बसेस थांबून होत्या़ बसेसच्या चालक आणि वाहकांची तळोदा बसस्थानकाचे नियंत्रक व्ही़डी़जावरे, वाहक क़ेआऱ साठे यांनी सोय करुन देत त्यांना भोजन उपलब्ध करुन दिल़े तळोदा बसस्थानकात महाराष्ट्रातील विविध आगारांच्या एकूण 13 व गुजरात राज्यातील 5 बसेस अद्यापही थांबून आहेत़ शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता अक्कलकुव्याकडे जाणा:या बसेस सोडण्यात आल्याची माहिती आह़े तळोदा बसस्थानकातील पाहुणचाराने विविध आगारांचे चालक आणि वाहक भारावले होत़े दरम्यान अक्कलकुवा व तळोदा बसस्थानकात अडकलेल्या गुजरात राज्यातील बसेस निझर मार्गाने वळवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आह़े