तळोद्यात चौकातील मारुतीही कुलूपबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 12:42 PM2020-03-23T12:42:54+5:302020-03-23T12:43:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी १४ तासांच्या जनता कर्फ्यूमध्ये तळोद्यातील जनतेने उत्स्फूर्त सहभाग नोंदवला़ सकाळी सातपासून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी १४ तासांच्या जनता कर्फ्यूमध्ये तळोद्यातील जनतेने उत्स्फूर्त सहभाग नोंदवला़ सकाळी सातपासून घरात बसून असलेले नागरीक सायंकाळी पाच वाजता थाळीनादाला बाहेर आले होते़ त्यानंतर ते पुन्हा घरात गेले़
तळोदा शहरातील व्यापारी आणि नागरिक यांचा दिवस चौकातील हनुमान मंदिरात दर्शन घेतल्यानंतर सुरु होतो़ परंतू रविवार मात्र याला अपवाद ठरला होता़ सकाळी सहापासून होणाऱ्या गर्दीऐवजी याठिकाणी कुलूप लावण्यात आले होते़ यातून अनेकांनी बाहेरुनच हात जोडून दर्शन घेत कोरोनाला दूर पळवण्याची प्रार्थना केली़ जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर तळोदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण, फौजदार ज्ञानेश्वर पाकळे, प्रशांत राठोड यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी बंदोबस्त तैनात केला होता़
तळोदा शहरातील स्मारक चौक, मेनरोड, हुतात्मा चौक, मारुती मंदिर परिसर, कॉलेज रोड चौफुली, बसस्थानक परिसरा सर्वच ठिकाणी कर्फ्यूमुळे सामसूम होती़ नागरिकांनी सहभागी होत असताना सोशल मिडियातून मात्र कोरोनाची जागृतीही सुरु ठेवल्याचे दिसून आले होते़ तळोदा शहरातून दररोज जाणाºया ट्रकांची संख्याही नगण्य झाल्याने बºहाणपूर-अंकलेश्वर राज्यमार्ग व शेवाळी-नेत्रंग महामार्ग ओस पडले होते़