परिवर्धा परिसरात मुसळधार
By admin | Published: June 3, 2017 01:08 AM2017-06-03T01:08:56+5:302017-06-03T01:08:56+5:30
दुस:या दिवशीही पाऊस : वीज खांब कोसळले, घरांवरील पत्रे उडाली
नंदुरबार : जिल्ह्यातील अनेक भागात शुक्रवारी पावसाने हजेरी लावली. नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागात हलका पाऊस झाला, तर शहादा तालुक्यातील परिवर्धासह परिसरात पावसाचा जोर अधिक होता. त्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, पत्रे उडाली.
जिल्ह्यात पावसाने दुस:या दिवशीही हजेरी लावली. ढगांच्या गडगडाटात आणि विजांच्या चमचमाटात पाऊस झाला.
परिवर्धे परिसरात मुसळधार पाऊस
परिवर्धे, ता.शहादा येथे शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास वादळी वा:यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. 15 ते 20 मिनिटे चाललेल्या या पावसामुळे सर्वत्र धावपळ उडाली होती. अनेक दिवसांपासून उकाडय़ाने त्रस्त झालेल्या नागरिकांना या पावसामुळे थोडय़ाफार प्रमाणात दिलासा मिळाला आहे. वादळी वा:यामुळे आलेल्या पावसाने गावातील अनेक घरांसह झाडांचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, दलित वस्तीतील समाज मंदिराचीही पत्रे उडाली असून, गावातील धनराज निकुंभे, दिलीप पानपाटील, ईश्वर गवळे व बाबूलाल मुरार पाटील यांच्या राहत्या घरावरील पत्रे 20 ते 25 फुटांर्पयत उडाल्याने भिंतींचेही नुकसान झाले आहे. तसेच वीज वितरण कंपनीचे पाच खांब कोसळून वीजपुरवठा खंडित झाला आहे.
हळदाणी परिसरात नुकसान
हळदाणी, ता.नवापूर येथे दुपारी चार वाजेच्या सुमारास वादळी वा:यासह किरकोळ स्वरूपाचा पाऊस झाला. या वेळी आंब्याच्या झाडावरील कै:या पडल्याने शेतक:यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. तसेच या पावसामुळे परिसरातील शेतीकामांनी वेग घेतला असून, घरांची दुरुस्तीसह गुरांसाठी चा:याची साठवणूक आदी कामांनी वेग घेतला आहे.
परिसरात सुरुवातीला वादळी वा:यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाने आगमन केले.