बकरी ईदच्या पार्श्वभुमीवर नंदुरबारात मौलानांची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 12:11 PM2020-07-21T12:11:31+5:302020-07-21T12:11:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : बकरी ईदच्या पार्श्वभुमीवर नंदुरबारातील मौलांनांची बैठक घेण्यात आली. ईद निमित्त सामुहिक नमाज पठण करू ...

Maulana's meeting in Nandurbar on the backdrop of Goat Eid | बकरी ईदच्या पार्श्वभुमीवर नंदुरबारात मौलानांची बैठक

बकरी ईदच्या पार्श्वभुमीवर नंदुरबारात मौलानांची बैठक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : बकरी ईदच्या पार्श्वभुमीवर नंदुरबारातील मौलांनांची बैठक घेण्यात आली. ईद निमित्त सामुहिक नमाज पठण करू नये, गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन यावेळी पोलीस विभागातर्फे करण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर बकरी ईदला आवश्यक त्या उपाययोजना कराव्या यासाठी पोलीस विभागातर्फे आवश्यक ती काळजी घेतली जात आहे. त्याच अनुषंगाने रविवारी पोलीस विभागातर्फे नंदुरबारातील सर्व मौलानांची बैठक घेण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार उपस्थित होते. यावेळी मौलांकडून विविध सुचना व त्यांचे मनोगत ऐकुण घेण्यात आले. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले, रमजान ईदच्या वेळी समाज बांधवानी प्रशासन आणि पोलिसांना चांगले सहकार्य केले. आता बकरी ईदला देखील सहकार्य अपेक्षीत आहे. सामुहिकरित्या नमाज पठण करू नये, मशिदींमध्ये नमाज पठण करू नये. घरातच नमाज अदा करावी. पोलीस आणि जिल्हा प्रशासनाकडून मिळणाऱ्या सुचनांचे पालन करण्याचे आवाहन केले.
पोलीस निरिक्षक सुनील नंदवाळकर, हवलदार जयेश गावीत, शैलेंद्र माळी, श्रीकांत पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: Maulana's meeting in Nandurbar on the backdrop of Goat Eid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.