खान्देशात येत्या आठ दिवसांमध्ये कमाल व किमान तापमानात पुन्हा वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 12:04 PM2019-03-06T12:04:35+5:302019-03-06T12:04:50+5:30
नंदुरबार : नंदुरबारसह खान्देशात येत्या आठ दिवसांमध्ये कमाल व किमान तापमानात पुन्हा वाढ होणार असल्याचा अंदाज ‘आयएमडी’तर्फे वर्तविण्यात आला ...
नंदुरबार : नंदुरबारसह खान्देशात येत्या आठ दिवसांमध्ये कमाल व किमान तापमानात पुन्हा वाढ होणार असल्याचा अंदाज ‘आयएमडी’तर्फे वर्तविण्यात आला आह़े 11 मार्चर्पयत नंदुरबारचे कमाल तापमान 37 अंश सेल्सिअसर्पयत जाणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आह़े
नंदुरबारचे तापमान 34 ते 35 अंश सेल्सिअसर्पयत स्थिर आह़े सध्या बंगालच्या उपसागरात बाष्पीभवनाची प्रक्रिया वाढली आह़े त्याच प्रमाणे पश्चिम राजस्थानाकडूनही उष्ण वा:यांचा प्रभाव वाढला आह़े त्यामुळे संपूर्ण राज्यात सरासरीच्या तुलनेत एक ते दोन अंशाने कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आह़े नंदुरबारात गेल्या आठवडय़ापासून सरासरी 34 अंश सेल्सिअसर्पयत तापमान स्थिर आह़े येत्या 11 मार्चर्पयत यात दोन अंशानी वाढ होण्याची शक्यता आह़े
दरम्यान, नंदुरबारात सध्या नागरिकांना संमिश्र हवामान अनुभवायला मिळत आह़े सकाळी व मध्यरात्री बोचरी थंडी तर दुपारी मात्र उकाडा सहन करावा लागत आह़े आठवडय़ापासून किमान तापमान 18 अंश सेल्सिअसर्पयत कायम असल्याने परिणामी थंडी कमी होऊन उकाडा जाणवू लागला आह़े फेब्रुवारी महिन्याच्या शेवटापासून ब:यापैकी तापमानात वाढ झालेली दिसून आली होती़
गेल्या महिन्यात चढ-उतार
फेब्रुवारी महिन्यात तापमानात मोठय़ा प्रमाणात चढ-उतार बघायला मिळाले होत़े 3 फेब्रुवारी रोजी खान्देशसह संपूर्ण राज्यात किमान तापमानात वेगाने घट झालेली दिसून आली होती़ साधारणत: आठवडाभर तापमानात गारवा होता़ त्यानंतर 20 फेब्रुवारी रोजी खान्देशातील कमाल तापमानात मोठय़ा प्रमाणात वाढ झालेली होती़ जळगावात फेब्रुवारीतच तब्बल 38 अंश सेल्सिअस इतके कमाल तापमानाची नोंद झालेली होती़ त्या खालोखाल धुळे व नंदुरबारचे कमाल तापमान 37 अंशावर कायम होत़े फेब्रुवारीत पस्तिशीपार कमाल तापमान गेल्याने उकाडय़ाचा सामना करावा लागला होता़ त्यानंतर साधारणत: 25 ते 27 फेब्रुवारीदरम्यान, अचानक गतीमान वा:यांचा प्रभाव जाणवू लागला होता़ जळगावात ताशी 18 तर नंदुरबारात 15 किमी वेगाने वारे वाहत होत़े साधारणत: दोन दिवस गतीमान वा:यांचा प्रभाव खान्देशात जाणवल्याने धुळीची समस्याही मोठय़ा प्रमाणात जाणवली होती़ त्यानंतर 1 व 3 मार्चदरम्यान किमान तापमानात पुन्हा एक ते दोन अंशाने घट झाल्याने थंडीत वाढ झाली होती़ त्यानंतर विदर्भासह मराठवाडय़ात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती़ त्यामुळे साधारणत: तीन ते चार दिवस जिल्ह्यात ढगाळ हवामानाची निर्मिती झाली होती़ त्यामुळे रब्बीतील हरभरा पिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसानही झाले होत़े आता पुन्हा नंदुरबारसह खान्देशात कमाल तापमान स्थिर असून पुढील आठवडय़ात तापमानात पुन्हा वाढ होणार असल्याची शक्यता ‘आयएमडी’च्या सूत्रांकडून मिळाली आह़े
तापमानात वाढ झाली असल्याने दिवसा मोठय़ा प्रमाणात उकाडा जाणवू लागला आह़े आता पुन्हा किमान तापमानात घट होण्याची शक्यता नसल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आह़े दरम्यान, तापमानात वाढ होत असल्याने याचा परिणाम आरोग्यावर होऊ नये म्हणून नागरिकांनी संतुलित आहार घ्यावा, जास्तीत जास्त पाणी प्यावे, उन्हापासून संरक्षण मिळण्यासाठी टोपी, रुमाल आदींचा वापर करावा असे आवाहन वैद्यकीय अधिका:यांकडून करण्यात येत आह़े