मेडिकल युनिटच्या महागड्या मोबाईल डिस्पेन्सरी गेल्या भंगारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:38 AM2021-09-16T04:38:02+5:302021-09-16T04:38:02+5:30

दरम्यान, एकीकडे विभागीय चाैकशी संथगतीने चालविण्यात येत असताना दुसरीकडे शासनाने तिघा युनिटसाठी प्रत्येकी ४० लाख रुपये खर्च करून खरेदी ...

Medical unit's expensive mobile dispensary in the last wreck | मेडिकल युनिटच्या महागड्या मोबाईल डिस्पेन्सरी गेल्या भंगारात

मेडिकल युनिटच्या महागड्या मोबाईल डिस्पेन्सरी गेल्या भंगारात

Next

दरम्यान, एकीकडे विभागीय चाैकशी संथगतीने चालविण्यात येत असताना दुसरीकडे शासनाने तिघा युनिटसाठी प्रत्येकी ४० लाख रुपये खर्च करून खरेदी केलेल्या मोबाईल डिस्पेन्सरी आणि छोट्या वाहनांचे काय, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. तळोदा तालुक्यासाठीची वाहने तत्कालीन तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दारात लावण्यात आल्याचा प्रकार समोर आला असून, धडगाव व अक्कलकुवा येथेही ही वाहने पडून आहेत. शासनाने रुग्णसेवेसाठी खरेदी केलेल्या या वाहनांची स्थिती अत्यंत दयनीय असून, त्यातील अनेक वस्तू गहाळ झाल्याची माहिती आहे.

कारवाई करणार

मोबाईल मेडिकल युनिट गैरव्यवहाराबाबत नाशिक येथील आराेग्य उपसंचालक डाॅ. पुना गांडाळ यांना संपर्क केला असता, माहिती घेणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. महेंद्र चव्हाण यांना मेडिकल युनिटबाबत संपर्क केला असता, लवकरच निलंबनाची कारवाई केली जाणार असल्याची माहिती त्यांच्याकडून देण्यात आली आहे.

Web Title: Medical unit's expensive mobile dispensary in the last wreck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.