शहादा येथे प्रशासन व मौलानांची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 12:33 PM2020-07-25T12:33:14+5:302020-07-25T12:33:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : बकरी ईद हा सण साध्या पद्धतीने व सोशल डिस्टंन्सिंगसह इतर नियमांचे पालन करून साजरा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : बकरी ईद हा सण साध्या पद्धतीने व सोशल डिस्टंन्सिंगसह इतर नियमांचे पालन करून साजरा करण्यात यावा. यासाठी शहादा शहरातील सर्व मशिदींचे मौलाना व सामाजिक कार्यकर्त्यांची बैठक उपविभागीय पोलीस कार्यालयाच्या आवारात घेण्यात आली.
बैठकीला प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे, उपविभागीय पोलीस अधिकारी तृप्ती पोडभिते, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, प्रभारी तहसीलदार डॉ.उल्हास देवरे, पालिकेचे मुख्याधिकारी डॉ.राहूल वाघ, पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील आदी उपस्थित होते. प्रांताधिकारी डॉ.गिरासे म्हणाले की, कोरोना विषाणूच्या संसर्गापासून नागरिकांची सुरक्षितता व्हावी म्हणून मुस्लीम समाजाने बकरी ईद सण हा साध्या पद्धतीने साजरा करावा. गेल्या चार महिन्यात आलेले विविध सण-उत्सव जसे साध्या पद्धतीने साजरे केले त्याचे पालन आताही व्हावे. गेल्या चार महिन्यात मुस्लीम बांधवांनी मशिदीत न जाता घरी नमाज अदा करीत आहेत. त्याच अनुषंगाने येणाऱ्या सण-उत्सवांनाही घरीच नजाम अदा करावी, असे आवाहन केले. शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून पदभार घेतलेल्या तृप्ती पोडभिते यांनीही सोशल डिस्टन्सिंगसह कोरोनाला रोखण्यासाठी असलेल्या नियमांचे पालन करून बकरी ईद साजरी करण्याचे आवाहन केले. या वेळी हाजी अल्ताफ मेमन, प्रा.लियाकत सैयद, डॉ.खलील अहमद, नगरसेवक वसीम तेली, अॅड.साजिद हाफिज, शमसुद्दीन, साजीद मन्सुरी, मौलवी साजिद जुबेर अन्सारी यांच्यासह शहरातील सर्व मशिदींचे मौलाना, शांतता कमिटीचे सदस्य उपस्थित होते.