विरोधी गटातील नगरसेवकांचा सभात्याग : नवापूर पालिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 12:22 PM2018-03-28T12:22:16+5:302018-03-28T12:22:16+5:30
सूचविलेले विषय अजेंडय़ावर न घेतल्याने नाराजी
लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 28 : पालिकेच्या सर्वसाधारण सभेत विरोधी गटातील नगरसेवकांनी सूचविलेल्या विकास कामांचे विषय सभेच्या अजेंडय़ावर घेण्यात न आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या चारही सदस्यांनी साप} वागणुकीचा आरोप करीत सभात्याग केला. विरोधकांचा हा आरोप मात्र सत्ताधा:यांकडून फेटाळण्यात आला.
पालिकेची सर्वसाधारण सभा नगराध्यक्षा हेमलता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. लोकहिताच्या अनेक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शिवसेना नगरसेवकांनी विविध विषय सूचविले होते. सभा सुरू झाल्यावर विषय सूचीवर आपण सूचविलेल्या विकास कामांच्या विषयांना या सूचित स्थान मिळाले नसल्याचे लक्षात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे नरेंद्र नगराळे, मीनल लोहार, खलील खाटीक व सविता नगराळे यांनी विरोधकांच्या विषयांना डावलून सत्ताधारी गट भेदभाव करीत असल्याचा आरोप करून सभात्याग केला व नाराजी व्यक्त केली. शिवसेनेच्या नगरसेविका अरूणा पाटील यांनीही लोकहिताचे विषय सूचविले असताना त्यालाही बगल दिल्याचा आरोप करून आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली.
यावर नगराध्यक्षा हेमलता पाटील यांनी गेल्या तीन महिन्यात केवळ दोन सर्वसाधारण बैठक झाल्या. त्यात प्रथम बैठकीत सर्वच्या सर्व 22 नगरसेवकांनी 107 विषय सूचविले. पैकी 42 विषयांना विषय सूचित स्थान देण्यात आले. या बैठकीसाठी सूचविण्यात आलेल्या एकूण 177 विषयांपैकी 30 विषयांची निवड केली असून पालिकेकडे उपलब्ध योजना व निधी पाहता विषय सूची निश्चित केल्याचे हेमलता पाटील यांनी सांगून विरोधकांना समजाविण्याचा प्रय} केला. सर्व नगरसेवकांनी सूचविलेले सर्वच विषय एकाच बैठकीत घेणे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट करुनही विरोधी गटातील सदस्यांनी सभात्याग केला.
शहरातील महादेव मंदिराच्या सरंक्षण भिंतीसह काही विकास कामासंदर्भात पालिका व सत्ताधारी गट उदासीन आहे की काय? म्हणून बैठक संपल्यावर अरूणा पाटील यांनी नगराध्यक्षा हेमलता पाटील यांच्याशी या विषयावर चर्चा केली. जुन्या महादेव मंदिरालगतच्या रस्त्याच्या कामावेळी संबंधित ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे सरंक्षण भिंत खचून पूर्ण नामशेष झाली आहे. मंदिराच्या संरक्षण भिंतीची पुनर्बाधणी व सुशोभिकरण, दशक्रीया विधी घाट व तेथे आवश्यक सुविधा उपलब्ध होणे हा जनतेचा श्रद्धा व आस्थेचा विषय असल्याने हे काम प्राधान्याने करुन मिळावे, असे अरूणा पाटील यांनी पटवून दिले. नगराध्यक्षा हेमलता पाटील यांनी पुढील सर्वसाधारण सभेत या विषयांना स्थान दिले जाईल, असे सांगितले.