शहादा येथे शांतता कमिटीची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2019 11:54 AM2019-09-01T11:54:38+5:302019-09-01T11:54:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरातील नवीन पोलीस स्टेशनच्या आवारात शनिवारी शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली. गणेशोत्वासह विविध सण-उत्सव ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शहरातील नवीन पोलीस स्टेशनच्या आवारात शनिवारी शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली. गणेशोत्वासह विविध सण-उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
बैठकीला आमदार उदेसिंग पाडवी, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक सपकाळे, तहसीलदार मनोज खैरनार, नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, पालिकेचे मुख्याधिकारी डॉ.राहुल वाघ, वीज कंपनीचे उपअभियंता डी.एन. पाटील, पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील उपस्थित होते.
पोलीस अधीक्षक पंडित म्हणाले की, सण-उत्सव साजरा करताना जनतेच्या व समाजाच्या भावना दुखावणार नाहीत अशा रितीने उत्सव साजरा करावा. गणेश मंडळांना प्रशासनाकडून तर प्रशासनाला गणेश मंडळांकडून सहकार्याची अपेक्षा असते. जनतेची गैरसोय होऊ नये म्हणून पोलीस प्रशासन 24 तास सज्ज असते. प्रशासन जनतेच्या पाठिंब्याशिवाय काम करू शकत नाही असे सांगून गणेश मंडळांनी गुलालमुक्त विसर्जन मिरवणुका काढण्याचे आवाहनही त्यांनी केले. आमदार पाडवी म्हणाले की, सार्वजनिक सण-उत्सव यादरम्यान शांतता व कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी प्रशासनाची असली तरी लोकप्रतिनिधी व जनतेचीही ती मोठी जबाबदारी आहे. सण-उत्सव साजरा करताना जनतेच्या भावनांना ठेच पोहोचणार नाही याचे भान सर्वानी ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. अपर पोलीस अधीक्षक गवळी म्हणाले की, जनतेचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनावर असली तरी जनतेकडूनही प्रशासनाला सहकार्याची अपेक्षा असते. ज्या गणेश मंडळांनी डीजे श्री विसर्जन मिरवणुकीसाठी भाडे तत्त्वावर घेतले असतील तर तो करार मंडळांनी रद्द करावा. श्री विसर्जन मिरवणुकीत डीजे आढळून आल्यास चालक व वाहनावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला. नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांनी सण-उत्सवादरम्यान शहरात स्वच्छता व पाणीपुरवठय़ासह पालिकेच्या अंतर्गत येणा:या सर्व सेवा जनतेला तातडीने पुरवण्याचे आश्वासन दिले. दीपक पाटील, डॉ.कांतीलाल टाटीया यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक उपविभागीय पोलीस अधिकारी सपकाळे यांनी केले.
बैठकीला जि.प.चे माजी उपाध्यक्ष रामचंद्र पाटील, जि.प. सदस्य अभिजित पाटील, माजी नगराध्यक्ष अशोक बागूल बाजार समितीचे सभापती सुनील पाटील, प्रा.संजय जाधव, नगरसेवक संदीप पाटील, संजय साठे, ज्ञानेश्वर चौधरी, के.डी. पाटील, अब्बास नुरानी, इरफान पठाण, समीर जैन, ललित छाजेड, मनोज चोरडिया, अॅड.जसराज संचेती, सुपडू खेडकर, मनलेश जयस्वाल, अनिल भामरे, यशवंत चौधरी, प्रा.लियाकतअली सैयद, प्रा.डॉ.खालील शहा, गौरव जैन, पोलीस पाटील भगवान पाटील, पुरुषोत्तम पाटील यांच्यासह शांतता कमिटीचे सदस्य, गणेश मंडळांचे पदाधिकारी, तालुक्यातील सर्व पोलीस पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.सुनील साळुंखे यांनी तर आभार पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांनी मानले.
गुलालाचा कमी वापर
करण्याचे आवाहन
415 दिवसांपूर्वी निमगूळ गावाजवळ झालेल्या बस अपघातात शहरातील आठ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गणेश मंडळांनी उत्सव साजरा करताना सामाजिक भान ठेवत श्री विसजर्न मिरवणुकीत गुलालाचा कमी वापर करून शिल्लक रकमेतून अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत करावी, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी बैठकीत केले.
4गणेशोत्सवानिमित्त काढण्यात येणा:या मिरवणुकीत डीजे आढळून आल्यास चालक व वाहनावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला.