अक्कलकुव्यात तालुका शांतता कमिटीची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 12:20 PM2019-08-30T12:20:49+5:302019-08-30T12:20:54+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : तालुका शांतता कमिटीची बैठक तहसील कार्यालयात घेण्यात आली़ अध्यक्षस्थानी तहसीलदार नितीनकुमार देवरे होत़े बैठकीत ...

Meeting of Taluka Peace Committee in Akkalkuwa | अक्कलकुव्यात तालुका शांतता कमिटीची बैठक

अक्कलकुव्यात तालुका शांतता कमिटीची बैठक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अक्कलकुवा : तालुका शांतता कमिटीची बैठक तहसील कार्यालयात घेण्यात आली़ अध्यक्षस्थानी तहसीलदार नितीनकुमार देवरे होत़े बैठकीत तालुक्यात साजरा होणा:या गणेशोत्सवाबाबत चर्चा करण्यात आली़
बैठकीस प्रमुख अतिथी म्हणून पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, सरपंच राजेश्वरी वळवी,  माजी आमदार डॉ़नरेंद्र पाडवी, भाजपा प्रदेश सदस्य नागेश पाडवी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमश्या पाडवी, पंचायत समितीचे माजी उपसभापती इंद्रपालसिंह राणा, ललित जाट, कपिल चौधरी, कय्युम पठाण, मन्सूर मेमन उपस्थित होत़े 
 प्रारंभी 2018 च्या गणेशोत्सवात नवनवीन उपक्रम राबवणा:या गणेश मंडळांना पारितोषिके देण्यात आली़ खापर येथील आर्यन गणेश मंडळ, जय श्रीराम गणेश मंडळ यांना प्रथम, अक्कलकुवा येथील संत जगनाडे महाराज गणेश मंडळास द्वितीय, तंटय़ा भिल गणेश मंडळ तृतीय तर  नवानगरमुथा बजरंग ग्रुप गणेश मंडळास उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आल़े
 पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी उत्सव काळात नागरिक कायदा व सुव्यवस्था पाळत सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली़ तहसीलदार देवरे, पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे यांच्यासह उपस्थित मान्यवरांनीही मनोगत व्यक्त करत शांतता आणि सलोखा ठेवत उत्सव साजरा करण्याचे सांगितल़े बैठकीत तालुक्यातील विद्युत वितरण कंपनी, सार्वजनिक बांधकाम विभागासह इतर महत्त्वपूर्ण विभागाच्या अधिका:यांनी अनुपस्थिती दिल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली़  
बैठकीस देवचंद अहिरे, बापु महिरे, किरण चौधरी, जीवन भन्साली यांच्यासह अक्कलकुवा, खापर व तालुक्यातील गणेश मंडळाचे पदाधिकारी, हिंदू-मुस्लिम समाज बांधव, तालुक्यातील सरपंच, पोलीस पाटील यांनी उपस्थिती दिली़  
सूत्रसंचालन नायब तहसीलदार विजय कचवे यांनी केल़े 
 

Web Title: Meeting of Taluka Peace Committee in Akkalkuwa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.