सुरत-भुसावळ मार्गावर मेगाब्लॉक : नंदुरबारातील प्रवासी ताटकळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 12:55 PM2018-02-26T12:55:29+5:302018-02-26T12:55:29+5:30

Mega Blocks on the Surat-Bhusawal route: Travelers from Nandurbar are waiting | सुरत-भुसावळ मार्गावर मेगाब्लॉक : नंदुरबारातील प्रवासी ताटकळले

सुरत-भुसावळ मार्गावर मेगाब्लॉक : नंदुरबारातील प्रवासी ताटकळले

Next


लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 26 : सुरत-भुसावळ रेल्वेमार्गावर गुजरात राज्यातील भेस्तानजवळ पुलाचे बांधकाम सुरू आह़े यामुळे रेल्वे या मार्गावर दोन्ही बाजूने धावणा:या 24 सुपरफास्ट गाडय़ा इतर मार्गाने तर सहा पॅसेंजर गाडय़ा रद्द करण्यात आल्या़ यामुळे रविवारी दिवसभर प्रवाशांचे प्रचंड हाल झाल़े
रविवारी नवजीवन (12655), बिकानेर-नांदेड (17624), प्रेरणा (22138), राजकोट- रीवा (22937) ह्या गाडय़ा सुरत-वसई मार्गाने जळगावकडे तसेच हावडा (12834), नवजीवन (12656) व जोधपूर एक्सप्रेस (22663) जळगाव-वसई मार्गाने सुरतकडे वळवण्यात आल्या़ सोमवारी पुरी-अहमदाबाद एक्सप्रेस (12843), हावडा एक्सप्रेस (12834), नवजीवन एक्सप्रेस (12656), पोरबंदर एक्सप्रेस (12906) या प्रवासी गाडय़ा निर्धारित केलेल्या मार्गाने जाणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर आधीच आरक्षित करून ठेवलेली तिकिटे रद्द करण्यासाठी प्रवासी व त्यांचे नातलग तिकीट खिडकी समोर गर्दी करत होत़े यात दिवसभरात गुजरात राज्यात जाणा:या 273 प्रवाशांनी तिकिटे रद्द केल्याची माहिती देण्यात आली आह़े तसेच भुसावळ व तेथून पुढे जाणा:या 100 च्या जवळपास प्रवाशांनी तिकिटे रद्द केल्याचे सांगण्यात आल़े यातील काही प्रवाशांच्या सोयीसाठी मुख्य तिकिट निरीक्षक यांनी पर्यायी गाडीत आरक्षित केलेले तिकिटे ग्राह्य धरण्यासंदर्भात शिक्का दिला़ यातून ब:याच जणांचा प्रवासाचा मार्ग मोकळा झाला़ तिकिट खिडकीवर सायंकाळर्पयत तिकीट रद्द करण्याचे अर्ज प्रवासी भरून देत होत़े दरम्यान रात्री उशिरा अंत्योदय एक्सप्रेस (15563), सुरत पॅसेंजर (59014), (59013), (59075) व (59076) या गाडय़ा गुजरातमधील गंगाधरा व बारडोलीर्पयत सोडण्यात आल्या़

Web Title: Mega Blocks on the Surat-Bhusawal route: Travelers from Nandurbar are waiting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.