गुणवंत शिक्षक पुरस्काराने जि. प. शिक्षकांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:38 AM2021-09-16T04:38:09+5:302021-09-16T04:38:09+5:30
यावेळी जिल्हा शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. त्यात नंदुरबार तालुक्यातून जि. प. शाळा, रणाळे खुर्दचे ...
यावेळी जिल्हा शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. त्यात नंदुरबार तालुक्यातून जि. प. शाळा, रणाळे खुर्दचे शिक्षक पंकज गोरख भदाणे, नवापूर तालुक्यातून जि. प. शाळा, धुडीपाडाचे शिक्षक मदन श्रीधरराव मुंढे, शहादा तालुक्यातून जि. प. कन्या शाळा प्रकाशाचे शिक्षक रवींद्र भाईदास पाटील, तळोदा तालुक्यातून जि. प. शाळा, रेवानगर पुनर्व. क्र. ३ चे शिक्षक हेमंत रामा ठाकरे, अक्कलकुवा तालुक्यातून जि. प. शाळा खटकुवाचे शिक्षक भरत कमजी तडवी, धडगाव तालुक्यातून जि. प. शाळा, कुंभारपाडा शाळेचे शिक्षक दिनकर बहादूर पावरा, तसेच महिला विशेष पुरस्कार अंतर्गत जि. प. शाळा, राजापूर तालुका नंदुरबार शाळेच्या शिक्षिका रोहिणी दिलीप बाविस्कर यांना पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. राहुल चौधरी यांनी प्रास्ताविक केले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ, माध्यमिक शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम, प्राथमिक उपशिक्षणाधिकारी भानुदास रोकडे यांनी मनोगत व्यक्त केले. किरण दाभाडे यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी रांगोळी रेखाटन करणाऱ्या एस. ए. मिशन हायस्कूलच्या विद्यार्थिनी, गीतगायन सादर करणाऱ्या श्रॉफ हायस्कूलच्या विद्यार्थिनी, रिमोटद्वारे दीपप्रज्वलन, तसेच प्रतिमापूजन उपक्रम साकारणारे एकलव्य हायस्कूलचे शिक्षक मिलिंद वडनगरे, तसेच सूत्रसंचालन करणारे शिक्षक किरण दाभाडे यांचादेखील सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे औचित्य साधून प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. राहुल चौधरी यांना रोटरी क्लब, नंदनगरी यांच्यामार्फत गुणवंत अधिकारी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राथमिक उपशिक्षणाधिकारी डॉ. युनूस पठाण, प्राथमिक शिक्षण विभागाचे सुनील गिरी, मयूर वाणी, प्रशांत पवार, रवींद्र बच्छाव यांनी परिश्रम घेतले.