गाढवाद्वारे द्यावा लागला ग्रामस्थांना संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 12:57 PM2020-04-24T12:57:30+5:302020-04-24T12:58:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व एकाचा झालेला मृत्यू यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. परंतु ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सारंगखेडा : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व एकाचा झालेला मृत्यू यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. परंतु नागरिक काळजी घेण्याबाबत अद्याही दुर्लक्ष करीत आहेत. तोंडाला मास्क लावणे, बाहेर न निघणे याविषयी आव्हान करूनही उपयोग होत नाही. या पाश्र्वभूमीवर ग्रामरक्षक दलाने गाढवालाच मास्क बांधून गावात फिरवून लोकांना अनोखा संदेश दिला.
या वेळी नियम मोडणा:या बहाद्दरांना समज देऊनदेखील काही फरक पडत नसल्याने त्यांना अद्दल घडावी यासाठी सारंगखेडा, ता.शहादा येथील स्थानिक प्रशासन व ग्रामरक्षक दलाच्या युवकांनी आगळावेगळा फंडा तयार केला आहे. या वेळी गावात मोकाट फिरणा:या गाढवांनाच चक्क मास्क बांधल्याने निदान यापासून तरी मुक्या जनावरांचा बोध माणसांनी घ्यावा व त्याचे अनुकरण करावे असेच, यातून संबंधित स्थानिक प्रशासनाला सुचित करावयाचे असावे असाच अर्थ नागरिकांमधून काढण्यात येत आहे.
शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील स्थानिक प्रशासनाने वेळोवेळी शासनाच्या सूचनांचे पालन करून जनजागृती करीत आहे. या वेळी ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने तीन दिवस पूर्णपणे बंद पाळला. तसेच गावातील युवकांचे ग्रामरक्षक दल स्थापन करून गावातील मुख्य रस्ते पूर्णत: बंद करून बाहेरगावहून येणा:या कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे.
दरम्यान गावातील किराणा दुकान ठरलेल्या वेळेव्यतिरिक्त सुरू राहिल्यास ग्रामपंचायतीकडून संबंधित दुकानदाराकडून दंडही आकारण्यात येत आहे. तसेच काही समजदार नागरिक ग्रामपंचायतीतर्फे देण्यात येणा:या सूचनांचे पालन करीत असून, काही युवक व ग्रामस्थ त्याकडे दुर्लक्ष करीत गावात फेरफटका मारीत असल्याचे दिसून येत असल्याने ग्रामपंचात प्रशासन व ग्रामरक्षक दलाच्या युवकांनी आगळी वेगळी शक्कल लढवीत गावात जनजागृती करीत आहे. जेणे करून त्याचा बोध तरी संबंधीत नागरिक घेतली, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.