म्हसावद ग्रा़पंसाठी 26 रोजी होणार मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 12:09 PM2017-09-21T12:09:42+5:302017-09-21T12:09:51+5:30

ग्रामपंचायत निवडणूक : सरपंच पदासाठी 23 तर सदस्यपदासाठी 163 अर्ज दाखल

 Mhasawad voters to vote on 26 | म्हसावद ग्रा़पंसाठी 26 रोजी होणार मतदान

म्हसावद ग्रा़पंसाठी 26 रोजी होणार मतदान

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार/नवापूर/अक्कलकुवा : म्हसावद ता़ शहादा येथील सहा प्रभागांतील 17 जागा आणि एक लोकनियुक्त सरपंच पदासाठी सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रियेत आयोगाने काहीअंशी बदल केला आह़े यापूर्वी ग्रामपंचायतीसाठी होणारे 23 रोजी होणारे मतदान आता 26 सप्टेंबर रोजी होणार आह़े दोन वाढवून मिळाल्याने प्रचार करणा:या उमेदवारांमध्ये उत्साह दुणावला आह़े  
निवडणूक आयोगाने म्हसावद ता़ शहादा येथे 26 सप्टेंबर तर जिल्ह्यात इतर 51 ग्रामपंचायतींसाठी सात ऑक्टोबर रोजी होणा:या मतदानावेळी शासकीय सुटी जाहिर केली आह़े ही सुटी त्या क्षेत्रातील मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी देण्यात आली आह़े नंदुरबार तालुक्यात 16, नवापूर 12, शहादा 7, अक्कलकुवा 15 आणि तळोदा तालुक्यात एका ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात ही सुटी देण्यात आली आह़े  
निवडणूक प्रक्रियेत बुधवारी दिवसभरात नंदुरबार जिल्ह्यातील 51 ग्रामपंचायतींच्या 185 प्रभागातील 504 सदस्यपदांसाठी 133 अर्ज तर सरपंच पदासाठी 23 अर्ज दाखल करण्यात आले आहेत़ सदस्य पदासाठी आतार्पयत 163 अर्ज दाखल आहेत़ बुधवारी अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार आणि नवापूर तहसील कार्यालयातील निवडणूक कक्षात दाखल झालेल्या इच्छुकांनी अर्ज दाखल केल़े विशेष म्हणजे सरपंच पदासाठी अर्ज दाखल झाल्याने नामनिर्देशनाची कोंडी फुटल्याचे बोलले जात आह़े आतार्पयत सर्वाधिक अर्ज हे नवापूर तालुक्यात आले आहेत़ तालुक्यातील 12 ग्रामपंचायतींसाठी आतार्पयत तब्बल 73 नामनिर्देशन दाखल झाले आहेत़ यात सात नामनिर्देशन हे लोकनियुक्त सरपंच पदासाठी आहेत़ गुरूवारी सुटी असल्याकारणाने बहुतांश उमेदवारांनी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती देण्यात आली आह़े यातही साधारण 200 च्यावर इच्छुकांचे नामनिर्देशन आयोगाच्या संकेतस्थळावर भरून तयार आहेत़ 

Web Title:  Mhasawad voters to vote on 26

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.